मुंबई : ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाच्या गोचरामुळे सर्वात मोठी उलथापालथ होणार आहे. कारण गुरु ग्रह मेष राशीत गोचर करण्यासोबत राहुशी युती करणार आहे. या युतीमुळे चांडाळ योग तयार होणार आहे. या युतीचा परिणाम पृथ्वीतलावर दिसून येईल. कारण हा सर्वात अशुभ योग म्हणून गणला जातो. हा योग 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. त्यामुळे जशी संगत तसं फळ अशी काहीशी स्थिती अनुभवायला मिळणार आहे. ज्योतिषांची या घडामोडीकडे बारीक नजर असून त्याचा परिणाम येत्या काही दिवसात दिसून येईल असा अंदाज बांधला आहे.
राहु आणि केतु हे दोन्ही छायाग्रह असून पापग्रहही आहेत. हे ग्रह ज्या ठिकाणी स्थित असतात त्या ठिकाणी अशुभ फळं देतात. गुरु राहु युती असेल तर ती व्यक्ती क्रूर, धूर्त, कायम आक्रमक असते. या योगामुळे पिता पुत्रामध्ये तणाव दिसून येतो. तसेच काही निर्णय घेणं कठीण होऊन बसतं. या योगाचा अर्थकारणावरही विपरीत परिणाम होतो.
पृथ्वी आणि भारताची लग्न रास वृषभ मानली गेली आहे. त्यामुळे चांडाळ योग द्वादश भावात होत आहे. साथीचे आजार, भूकंप, वादळ या सारख्या घटना घडण्याची शक्यता आहे. सध्या कोरोनाचे रुग्णही झपाट्याने वाढत असल्याने चिंता आहे. त्याचबरोर राजकीय उलथापालथही होण्याची शक्यता आहे.
31 मार्च 2023 पासून बुध ग्रह राहुच्या संपर्कात आला आहे. गुरु ग्रह बुधाच्या नक्षत्रात आहे आणि बुध मेष राशीत राहुसोबत आहे. यामुळे गुरु राहुचा थेट संबंध जुळून येत आहे. त्यामुळे हळूहळू साथीचे आजार हातपाय पसरेल असं दिसतंय. 23 एप्रिलला बुध, राहु आणि गुरु एकाच राशीत असतील.
7 जुलै 2023 ते 8 ऑगस्ट 2023 हा काळ राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणेल. या दरम्यान तणावपूर्ण स्थिती दिसून येईल. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक खराब प्रभाव 22 एप्रिल 2023 चे 14 मे 2023 दरम्यान दिसून येईल. युद्धजन्य स्थिती निर्माण होऊ शकते.
राहु गुरुच्या युतीमुळे नैसर्गिक संकट ओढावू शकते. पूरस्थिती, भूकंप आणि इतर नैसर्गिक संकटाचा मारा होऊ शकतो. पाकिस्तानात सरकार विरोधात जनतेचा रोष दिसून येईल. दुसरीकडे, अमेरिकेत आर्थिक संकट आल्याने नोकऱ्यांवर गदा येईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)