मुंबई : गुरुवारच्या व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. वास्तविक, आठवड्यातील गुरुवार हा भगवान विष्णू नारायण आणि बृहस्पती म्हणजेच गुरू देव यांना समर्पित आहे. अशा स्थितीत या दिवशी व्रत आणि उपासनेचे महत्त्व अधिक वाढते. मान्यतेनुसार, गुरुवारी व्रत (Guruwar Vrat) केल्यास भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. याशिवाय लग्नाशी संबंधित समस्याही दूर होतात. त्यामुळे जर तुम्हीही गुरुवारी उपवास ठेवणार असाल तर त्याआधी या व्रताशी संबंधित नियम जाणून घ्या.
पौष महिन्यात गुरुवारी व्रत करू नये. गुरुवारी व्रत सुरू करण्यासाठी अनुराधा नक्षत्र आणि महिन्यातील शुक्ल पक्षाची तिथी शुभ मानली जाते. असे म्हटले जाते की या तारखांना गुरुवार व्रत सुरू केल्याने भगवान विष्णू आणि बृहस्पतिचे अपार आशीर्वाद मिळतात. जे लोकं आधीच गुरुवारी उपवास करतात ते पौष महिन्यात पूजा आणि उपवास करू शकतात.
स्त्री आणि पुरुष दोघेही गुरुवारचा उपवास करू शकतात. काही लोकं नवस पूर्ण होईपर्यंत हे व्रत करतात. 16 गुरुवारी उपवास करणे चांगले मानले जाते. याशिवाय 1, 3, 4, 7 किंवा एक वर्षासाठी ठेवता येईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)