केस गळती आणि कमकुवत बुद्धिमत्ता राहु ग्रह खराब असल्याची लक्षणं, महादशेत करा हे ज्योतिषीय उपाय

| Updated on: May 09, 2023 | 3:00 PM

राहु आणि केतु यांना ज्योतिषशास्त्रात पाप ग्रह संबोधलं गेलं आहे. या ग्रहांच्या सान्निध्यात एखादा शुभ ग्रह आला तर तोही अशुभ फळं देतो. त्याचबरोबर राहुची स्थिती कुंडलीत खराब असेल तर काही संकेत मिळतात.

केस गळती आणि कमकुवत बुद्धिमत्ता राहु ग्रह खराब असल्याची लक्षणं, महादशेत करा हे ज्योतिषीय उपाय
राहु ग्रहचा प्रभावामुळे होते केस गळती! जाणून घ्या ज्योतिषीय उपाय
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्र ग्रह, नक्षत्र आणि राशीचक्र यावर अवलंबून आहे. ज्योतिषशास्त्रात अशुभ योग आहेत, तसेच त्यावर उपायही सांगण्यात आले आहेत. राहु हा नवग्रहांपैकी एक महत्त्वाचा ग्रह आहे. गोचर करताना हा ग्रह उलट्या दिशेने प्रवास करतो. तसेच एका राशीत दीड वर्षे ठाण मांडून बसतो. राहु हा जीवनात आनंद देतो, तर कधी त्रासही देतो. त्यामुळे राहुची स्थिती कुंडलीत कशी याकडे ज्योतिषांचं लक्ष असतं. कुंडलीत राहु कमकुवत असेल व्यक्तीला नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागतं. विचार करण्याची क्षमात कमी होऊ लागते. तसेत कायम चिंताग्रस्त राहतो. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

कुंडलीत राहु कमकुवत असण्याची लक्षणं

नखं तुटणे आणि केस गळती : राहु कमकुवत असेल तर अशा व्यक्तीची नखं तुटू लागतात. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात केस गळती होते. त्यामुळे मानसिक त्रास होतो. तसेच व्यक्ती समाजात वावरणं झिडकारतो.

बुद्धिमत्ता कमकुवत होणे : राहु कमकुवत असल्याने त्याचा परिणाम बुद्धिमत्तेवर होतो. त्यामुळे अशा व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अनेकदा एखादी गोष्ट विसरून जातो. तसेच निर्णय घेण्यास सक्षम नसतो.

साप दिसणे : कुंडलीत राहुची स्थिती कमकुवत असेल तर अशा व्यक्तीला वारंवार साप दिसतो. मेलेला किंवा जिवंत साप दिसतो. त्यामुळे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो.

मेलेली पाल दिसणे : राहु स्थिती कमकुवत असलेल्या लोकांना कायम मेलेली पाल दिसते. अशा स्थितीचा व्यक्तीच्या मानसिक आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होतो.

घरात भांडणं होणे : ज्योतिषशास्त्रानुसार, राहु कमकुवत असलेल्या व्यक्तीच्या घरात कायम भांडणं होत असतात.

राहुचे अशुभ परिणाम दूर करण्यासाठी उपाय

  • राहुच्या अशुभ परिणामापासून वाचण्यासाठी दररोज 108 वेळा ‘ओम रां राहवे नम:’ मंत्राचा 108 वेळा जप करावा.
  • कुंडलीतील अशुभ स्थिती असेल तर पक्ष्यांना बाजरी खायला द्यावी.
  • राहुची स्थिती चांगली करण्यासाठी नियमित राहु कवचाचं पठण करावं.
  • सोमवार आणि शनिवारी शिवलिंगावर जलाभिषेकासह तीळ अर्पण करा.
  • राहु दोष कमी करण्यासाठी रोज अंघोळीच्या पाण्यात कुश टाकावे.
  • बुधवारपासून सुरु करत पुढचे सात दिवस काळ्या कुत्र्याला गोड चपाती खायला द्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)