Astro Upay : तांदळाचा एक दाणा बदलू शकतं तुमचं नशिब, वास्तुदोष दूर करण्यासाठी प्रभावी उपाय

| Updated on: Apr 04, 2023 | 10:36 PM

हिंदू धर्मात पुजेसाठी अक्षतांचा वापर केला जातो. या अक्षतांचं खास असं महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात काही प्रभावी तोडगे सांगण्यात आले आहेत. त्यामुळे आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होते.

Astro Upay : तांदळाचा एक दाणा बदलू शकतं तुमचं नशिब, वास्तुदोष दूर करण्यासाठी प्रभावी उपाय
तांदळाचा एक दाणा तुम्हाला देईल जबरदस्त साथ, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय प्रभावी तोडगा
Follow us on

मुंबई – हिंदू धर्मात प्रत्येक वस्तुचं महत्त्व आहे. सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक वस्तुंची गणना केली आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तूंचे प्रभावी तोडगे सांगण्यात आले आहेत. हिंदू धर्मात तांदळाचं विशेष महत्त्व आहे. रोजच्या आहारात असलेल्या तांदळाला अक्षत म्हणून संबोधलं जातं. अक्षतांशिवाय देवी देवतांची पूजा अपूर्ण असल्याचं मानलं गेलं आहे. इतकंच काय तर प्रत्येक शुभ कार्यात तांदळाचा वापर केला जातो. आरतीचं ताट असो की, लग्न असो, अक्षताचं महत्त्व अधोरेखित होतं. या अक्षतांचा उपाय करून वास्तुदोषातून मुक्तीम मिळवता येते. चला जाणून घेऊयात तांदळाचे तोडगे..

शिवलिंगावर जल अर्पण केलं तरी भगवान शंकर प्रसन्न होतात. पण शिवलिंगावर अक्षता अर्पण केल्यावर शिव शंकर लवकर प्रसन्न होतात. अक्षता शिवलिंगावर ठेवा. त्यानंतर एक बेलपत्र घेऊन त्याचं देठ आपल्या बाजूने राहील अशा पद्धतीने तांदळावर मनोकामना सांगत वाहा. त्यानंतक कलशातून जलअर्पण करा. तसेच शिवलिंगातून पडणारं पाणी कपाळी आणि डोळ्यांना लावा. यामुळे तुमची इच्छा पू्र्ण होण्यास मदत होते.

घरात वास्तुदोष असेल तर मुख्य दारात एक स्वस्तिक काढा. त्यावर रोज अक्षता आणि जल अर्पण करा. यामुळे घरात सकारात्मक उर्जा येते. तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद मिळतो. तसेच घरातील वास्तुदोषही दूर होतो.

धनलाभासाठी शुक्रवारचा एक तोडगा ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आला आहे. शुक्रवारी 21 पिवळे तांदळाचे दाणे घ्या आणि ते लाल कपड्यात बांधून पोटली तयार करा. तांदूळ पिवळे करण्यासाठी हळदीचा वापर करा.. ही पोटली तिजोरी किंवा पर्समध्ये ठेवा. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील आणि कधीच आर्थिक चणचण भासणार नाही. पूजेत तुटलेल्या तांदळाचा वापर करू नका.

घरात आर्थिक अडचण असेल तर देवी अन्नपूर्णाची मूर्ती अक्षत मांडून स्थापित करा. आर्थिक स्थिती चांगली राहील. ‘अक्षताश्च सुरश्रेष्ठ कुंकमाक्ता: सुशोभिता:, मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर’ या मंत्राचा जप करून अक्षता अर्पित करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)