मुंबईः महाराष्ट्राच्या इतिहासात सध्या वेगळाच प्रवाह सुरु आहे. पहिल्यांदाच विरोधी पक्षाकडे लोकांचा ओघ वाढतोय, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज काही महत्त्वाच्या नेत्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यात मराठवाड्यातील दोन नेत्यांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर (Snatosh Bangar) यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी संतोष टारफे (Santosh Tarfe) आणि अजित मगर (Ajit Magar) यांना शिवसेनेत प्रवेश दिला. मुंबईत मातोश्रीवर खास पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी या नेत्यांचं पक्षात स्वागत केलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही मोठी खेळी खेळल्याचं बोललं जातंय. नुकतेच शिवसेनेत आलेल्या या दोन नेत्यांची राजकीय कारकीर्द काय आहे हे पाहुयात.
2019 ला त्यांनी महत्त्वाच्या पक्षाकडून विधान सभेचे तिकीट मिळण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. ऐनवेळी त्यांना वचिंतकडून कळमनुरी विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्यांना 66 हजार 137 मते पडली तर शिवसेनेचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांना 82 हजार 500 मते पडली ,16 हजार मतांनी बांगर यांनी अजित मगर यांना पराभूत केले. त्या मुळे अजित मगर हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर कॉग्रेस चे संतोष टारफे हे तिसऱ्या क्रमांक राहिले. नंतर अजित मगर यांनी कोरोना काळात अनेक कामे केली त्यानंतर अजित मगर हे अन्य पक्षात जाणार असल्याची चर्चा होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आधी काँग्रेसमधून माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा प्रवेश करून घेतला तर आता कळमनुरी विधान सभेत आमदार संतोष बांगर यांना शह देण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांचा पक्ष प्रवेश झाला.
संतोष टारफे हे काँग्रेसचे कार्यअध्यक्ष शिवाजी मोघे याचे जावाई आहेत. स्व. खासदार राजीव सातव यांच्या विरोधात 2009 मध्ये त्यांनी बसपाकडून कळमनुरी विधान सभा लढवली. त्या वेळी राजी सातव 25800 मतांनी निवडून आले. त्यानंतर राजीव सातव यांनी संतोष टारफे यांची राजकीय ताकद पाहून 2012 साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश करून घेतला. नंतर 2012 साली त्यांच्या पत्नी वंदना टारफे यांनी पिंपळदरी गटातून जिल्हा परिषद लढवली व निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेस वाढीला सुरुवात केली.