मुंबई- होळी पौर्णिमा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. या दिवशी केलेल्या तोडग्यामुळे ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो. असं असताना होळी सणापूर्वी ग्रहांची कृपा काही राशींवर होणार आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या होळी पौर्णिमला चार राशींवर विशेष कृपा असणार आहे.7 फेब्रुवारीला बुध ग्रहाने मकर राशीत गोचर केलं आहे. त्यानंतर आता 13 फेब्रुवारीला सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. तसेच 15 फेब्रुवारीला शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे ग्रहांची युती आघाडी आणि स्थानातील स्थितीमुळे चार राशीच्या लोकांना नोकरी- व्यवसाय इतर कामात फायदा होईल. चला जाणून घेऊयात भाग्यशाली राशींबाबत…
धनु- तीन ग्रहांच्या गोचरामुळे या राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते.त्याचबरोबर पदोन्नतीचा प्रबळ योग जुळून आला आहे. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच उत्पन्नातही वाढ होईल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल. कामाचा ताण सहजरित्या दूर करण्याची ग्रहांची स्थिती अनुकूल आहे.
मिथुन- ग्रहांच्या स्थितीमुळे मिथुन राशीच्या जातकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. कुटुंबात एखादं शुभ कार्य पडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. आत्मविश्वास वाढेल त्यामुळे प्रत्येक काम उत्साहाने पार पाडाल. असं असलं तरी चुकीचा निर्णय घेत नाही ना याची काळजी घ्याल. नोकरी करणाऱ्यांच्या नवी ऑफर मिळू शकते.
सिंह- या राशीच्या लोकांना ग्रहांच्या गोचरानंतर चांगली फळं उपभोगायला मिळतील. घरात नवीन वाहन येण्याचं योग आहे. म्हणजेच नवं वाहन खरेदी करण्याची इच्छा असल्यासं तुम्ही खरेदी करु शकता.संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या दांपत्यांना खूशखबर मिळेल. तसेच कौटुंबिक जीवन आनंदीदायी वाटेल.तुमच्या उत्पन्नात या काळात वाढ होईल.
मेष- ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे उत्पन्न वाढण्याचा योग आहे. त्यामुळे या काळात डोक्यावरील टेन्शनचा भार कमी होईल. नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल. तसेच नव्या नोकरीचं ऑफर लेटर तुमच्या हातात पडेल. असं असलं तरी आपल्या जीभेवर नियंत्रण ठेवा आणि राग येईल असं वागू नका. यामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)