मुंबई : होळी (Holi 2023) हा सण दरवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदेला साजरा केला जातो. होळी, रंगांचा सण, हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. होलिका दहन दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केले जाते. यावेळी होलिका दहन मंगळवार 07 मार्च रोजी होणार आहे. होळी हा सण नववधूंसाठी अतिशय शुभ मानला जातो. होळीच्या दिवशी नववधूंना काही नियम पाळावे लागतात. ज्योतिष शास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या कोणत्याही नवविवाहीत महिलेने होळीच्या वेळी करू नयेत. कोणती आहेत ती कामे जाणून घेऊया.
जर एखाद्याचे नवीन लग्न झाले असेल आणि त्यांची ही पहिली होळी असेल तर लक्षात ठेवा की या काळात तुम्ही काळे कपडे घालू नका. असे मानले जाते की काळ्या रंगाच्या कपड्यांकडे नकारात्मक ऊर्जा लवकर सक्रिय होते. म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी नववधूने लाल किंवा पिवळे कपडे परिधान करावेत.
मान्यतेनुसार, नवविवाहित स्त्रीने कधीही सासरच्या घरी तिची पहिली होळी साजरी करू नये. सासू आणि सून एकत्र पेटलेली होळी पाहिली तर घरात तेढ निर्माण होते, असे म्हणतात. यासोबतच सासरच्या घरी पहिली होळी पाहणे नवविवाहित महिलेच्या भावी आयुष्यासाठी अशुभ मानले जाते.
होलिका दहनाच्या आधी नववधूंनी लग्नाचे कोणतेही साहित्य कोणालाही देऊ नये. होलिका दहनावर अनेक ठिकाणी तंत्र साधनाही केली जाते. म्हणूनच नववधूने तिच्या लग्नाच्या पोशाखातील कोणतीही वस्तू कोणालाही देऊ नये. असे केल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.
संध्याकाळी होलिका दहनाच्या वेळी जव किंवा अक्षत अग्नीत टाका.लोकं होलिकाभोवती प्रदक्षिणा घालतात. या आगीत नवीन पीक अर्पण केले जाते आणि भाजले जाते. भाजलेले धान्य प्रसाद म्हणून वाटले जाते. असे करणे शास्त्रात खूप शुभ मानले गेले आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)