मुंबई : हिंदू धर्मात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळी बुधवार, 8 मार्च रोजी साजरी होणार आहे. रंगांचा सण होळीपूर्वी काही गोष्टी घरी आणणे तुमच्यासाठी शुभ असू शकते. वास्तविक, ज्योतिषशास्त्रात होळीच्या (Holi Astrology Tips) दिवसाशी संबंधित काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांनी घरात लक्ष्मी वास करते आणि घरात सुख-समृद्धी येते. चला तर मग जाणून घेऊया या दिवसाचे खास उपाय.
घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याच कामात करण्यात यश मिळत नसेल, तर हे कदाचीत घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे होऊ शकते. म्हणूनच होळीच्या आधी एक सुंदर तोरण तुमच्या घरी आणा आणि घराच्या मुख्य दरवाजावर लावा. यामुळे वास्तुदोष दूर होतील.
तुमच्या घरात पैशाचा प्रवाह वाढवण्यासाठी घराच्या उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला फिशपाॅट ठेवा. या दिशेला कुबेराचे स्थान म्हणतात आणि येथे फिशपाॅट ठेवल्याने सुख-समृद्धी वाढते.
घरामध्ये बांबूचे रोप ठेवणे शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. म्हणूनच होळीच्या आधी तुमच्या घरी बांबूचे रोप नक्की आणा. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहील आणि सौभाग्यही वाढेल.
होळीपूर्वी आपल्या घरी क्रिस्टल कासव आणणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक प्रगती आणि संपत्तीत वाढ होते.
घरामध्ये ड्रॅगनची मूर्ती किंवा चित्र ठेवणेदेखील खूप शुभ मानले जाते. हे लावल्याने घरातील सदस्यांची वाईट नजर जात नाही आणि घरात माता लक्ष्मी वास करते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)