मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवर बरंच काही अवलंबूत असतं. ग्रहांच्या गोचरासोबत त्यांची स्थिती आणि दृष्टी खूप महत्त्वाची ठरते. शनिदेव सध्या स्वरास असलेल्या कुंभ राशीत आहे. त्यामुळे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण केला आहे. त्याता शनिदेव वक्री स्थितीत भ्रमण करत आहेत.कुंडलीत 1,4,7,10 हे स्थान केंद्र स्थान संबोधलं जातं. या स्थानांमधये भगवान विष्णुंचं स्थान असल्याचं सांगितलं जातं. चारही केंद्रासाठी पाचवं आणि नववं स्थान त्रिकोण स्थान तयार करते. याला लक्ष्मी स्थान मानलं जातं. कुंडलीत जेव्हा त्रिकोणचा स्वामी ग्रह केंद्रात उच्च स्थानी बसला असेल किंवा केंद्र स्वामी ग्रह त्रिकोणमध्ये उच्च स्थानी असेल तेव्हा केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतो. अशात या स्थानात ग्रहांचा गोचर होते तेव्हा कुंडलीत केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतो. केंद्र त्रिकोण राजयोगामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ होणार आहे. अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
सिंह : केंद्र त्रिकोण राजयोगामुळे या राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून असलेली आर्थिक अडचण दूर होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना नवी जबाबदारी मिळेल. तसेच पद वाढल्याने आपल्या हातून काही चांगली कामं होतील. त्यामुळे कंपनी आणि वैयक्तिक स्तरावर तुम्हाला फायदा होईल. पत्नीकडून उत्तम साथ मिळेल.
कुंभ : केंद्र त्रिकोण राजयोगामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. कारण हा योग या राशीच्या लग्न स्थानात तयार होत आहे. आत्मविश्वास आणि बुद्धीच्या जोरावर काही निर्णय घ्याल. हे निर्णय पथ्यावर पडतील. काही इच्छा या काळात पूर्ण होतील. व्यवसायिकांना या काळात लाभ होऊ शकतो. वाद होईल असं वागू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा.
तूळ : केंद्र त्रिकोण राजयोग या राशीच्या पंचम स्थानात तयार होत आहे. यामुळे मुलांकडून चांगल्या बातम्या कानावर पडतील. त्यांची प्रगती पाहून ऊर भरून येईल. या कालावधीत तुम्ही काही किचकट निर्णय घेऊ शकता.स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. तसेच अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. जागेशी निगडीत व्यवहार या कालावधीत पूर्ण होऊ शकतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)