मुंबई : ज्योतिषशास्त्राचं गणित पूर्णत: नवग्रहांच्या स्थितीवर अवलंबून आहे. कारण ग्रहांची स्थिती ठराविक कालावधीनंतर बदलत असते आणि त्याचा थेट पृथ्वीतलावर आणि मानवी जीवनावर परिणाम होत असते. सध्या ग्रहांमध्ये सेनापतीचा दर्जा असलेला मंगळ ग्रह कन्या राशीत विराजमान आहे. मंगळाच्या या स्थितीमुळे शत्रुहंता योग तयार झाला आहे. कुंडलीत सहावं स्थान हे शत्रूचं मानलं जातं. त्यामुळे या स्थानावर मंगळ किंवा शनिची दृष्टी पडते तेव्हा शत्रुहंता योग तयार होतो. या योगामुळे कर्ज, कायदेशीर प्रश्नातून सुटका होते. तसेच प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित यश मिळते. मंगळ हा ग्रह कन्या राशीत 18 सप्टेंबर 2023 पर्यंत असणार आहे. त्यानंतर हा योग संपुष्टात येईल. या योगामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात तीन राशीच्या जातकांना कसा लाभ होणार ते…
मेष : मंगळ हा ग्रह कन्या राशीत विराजमान असल्याने या राशीच्या सहाव्या स्थानात विराजमान आहे. यामुळे शत्रुहंता योग निर्माण झाला आहे. या स्थितीचा या राशीच्या जातकांना जबरदस्त लाभ होणार आहे. आत्मविश्वासात वाढ होईल. तसेच गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कायदेशीर प्रकरणातून सुटका होईल. तसेच करिअरमध्ये काही चांगल्या संधी चालून येतील. थोड्याशा मेहनतीने जास्तीचं फळ मिळेल अशी स्थिती आहे. समाजात मानसन्मान वाढ होईल.
कर्क : या राशीच्या तिसऱ्या स्थानात मंगळ ग्रह विराजमान आहे. त्यामुळे शत्रूपक्षावर सहज विजय मिळवाल. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं कट कारस्थान संपुष्टात येईल. तुमच्या हातात सत्तेचं गणित बसल्याने विरोधकांची पळता भुई थोडी होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना अपेक्षित बदल दिसतील. गेल्या काही दिवसांपासून आपल्या विरोधात असलेलं वातावरण आपल्या बाजूने येईल. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल.
तूळ : या राशीच्या बाराव्या स्थानात मंगळ ग्रह विराजमान आहे. बारावं स्थान हे व्यय स्थान म्हणून गणलं जातं. त्यामुळे मंगळाची उत्तम साथ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी असलेलं नकारात्मक वातावरण दूर होईल. प्रत्येक पावलावर तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न होईल. पण मंगळाची उत्तम साथ असल्याने तुम्ही सहज त्यांच्यावर विजय मिळवाल. त्यामुळे शत्रूपक्ष पुरता हैराण होऊन जाईल. तसेच त्यांचंच नुकसान झाल्याने त्यांना तुमच्या पायाशी येणं भाग पडेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)