खूप सोसलं आता फक्त काही दिवस; गुरु-चंद्राची युती घडवणार चमत्कार, या चार राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

| Updated on: Nov 08, 2024 | 5:08 PM

16 नोव्हेंबर रोजी शनिवारी तीन वाजून सतरा मिनिटांनी वृषभ राशीमध्ये चंद्राचा प्रवेश होणार आहे. यामुळे चंद्र आणि गुरुची युती होणार असून, चार राशींना याचा मोठा फायदा होणार आहे.

खूप सोसलं आता फक्त काही दिवस; गुरु-चंद्राची युती घडवणार चमत्कार, या चार राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार
Rashi_Chakra
Follow us on

16 नोव्हेंबर रोजी शनिवारी तीन वाजून सतरा मिनिटांनी वृषभ राशीमध्ये चंद्राचा प्रवेश होणार आहे. सोमवार 18 नोव्हेंबर चार वाजून 31 मिनिटांपर्यंत चंद्र वृषभ राशीमध्ये राहणार आहेत. गुरु पहिल्यापासूनच वृषभ राशीमध्ये विराजमान आहेत. त्यामुळे येत्या 16 नोव्हेंबरला चंद्र आणि गुरुची युती होणार आहे. ज्यामुळे गजकेसरी योग निर्माण होणार आहे.चद्र आणि गुरुची ही युती चार राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी असणार आहे. गुरू आणि चंद्राच्या युतीचा या राशींवर अतिशय सकारात्मक परिणाम होणार आहे.

चंद्र- गुरु युतीचा कोणत्या राशींवर परिणाम होणार?

वृषभ : 16 नोव्हेंबरला होणारी चंद्र आणि गुरुची युती वृषभ राशींच्या लोकांसाठी विशेष फायद्याची ठरणार आहे. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे या राशींच्या लोकांना नवीन संधी प्राप्त होणार आहेत. जे लोक नोकरी करतात अनेक दिवसांपासून प्रमोशनच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांच्या प्रमोशनचा योग बनत आहे. व्यवसायात देखील मोठा फायदा होऊ शकतो. तसेच आर्थिक स्थितीमध्ये देखील मोठी सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत.

कर्क: जर तुमची राशी कर्क असेल तर तुमच्यासाठी देखील ही युती शुभ असणार आहे. कर्क या राशीचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे या राशीवर गुरु आणि चंद्राच्या युतीचा शुभ प्रभाव दिसून येणार आहेत. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नव्या आणि अधिक चांगल्या संधी मिळू शकतात. या काळामध्ये तुमंचं एखादं मोठं काम होण्याची शक्यता आहे.

धनु : या राशीच्या लोकांना देखील चंद्र आणि गुरुची युती विशेष फलदायी राहणार आहे. एखाद्या कामात स्वत: पुढाकार घेऊन तुम्ही जर काम केलं तर त्यामध्ये तुम्हाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायात येत असलेले संकट या काळात दूर होणार आहेत. तसेच जे व्यक्ती नोकरी करतात त्यांना देखील एखादी मोठी संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे.

मीन: या राशीला देखील चंद्र आणि गुरुची युती विशेष फलदायी ठरणार आहे. व्यावसाय आणि नोकरीमध्ये विशेष संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुमच्या नेतृत्वात काम करणारे कर्मचारी देखील या काळात तुम्हाला पूर्णपणे सहयोग देताना दिसून येतील, त्यामुळे तुमचं काम आणखी सोप होणार आहे. या काळात तुमचं एखादं मोठं काम होण्याची शक्यता आहे.