ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 10 October 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
प्रोफेशनला लाईफमध्ये तुमच्यावर तुमच्या भावनांना वरचढ होऊ देऊ नका. पैशाचा योग्य वापर करा. नाही तर मोठा खर्च होईल. मन लावून तुमची मेहनत पार पाडा. तुमच्या क्षमतांना कमी समजू नका. तुमच्या पर्सनॅलिटीला चमकू द्या. ऑफिसमधील कामामुळे तुम्ही दिवसभर व्यस्त राहाल. हायड्रेटेड राहायला विसरू नका. डाएटमध्ये सुधारणा करा.
आज वृषभ राशीच्या लोकांनी आपली क्रिएटीव्हीटीवर फोकस ठेवावा लागणार आहे. तुमच्या लव्ह लाइफमधील बदल स्वीकारा. हेल्दी लाइफस्टाईल ठेवा. आज संधी तुमचं दार ठोठावेल. त्यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. रोज एक्सरसाईज करा. वाहने वेगात चालवू नका. दूरचा प्रवास टाळा.
पैसे आणि परिस्थितीत तुमच्यासाठी आज पॉझिटिव्ह असेल. पण देवाण-घेवाण करताना सावध राहा. तुमचं शरीर आणि मेंदू याचा ताळमेळ ठेवा. नवीन प्रकल्प मिळतील. व्यापाऱ्यांची आज मोठी डील होईल. कामाचा ताण वाढणार आहे. त्यामुळे मानसिक संतुलन ढासळण्याची शक्यता आहे. लोकलच्या गर्दीत भांडण करू नका. गावाला जाण्याचा योग आहे. तुमची रखडलेली कामे आज मार्गी लागतील. विधी व्यवसायातील लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. गारमेंट फॅक्ट्रीत काम करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
कर्क राशीच्या लोकांना आज यशाचे मार्ग शोधावे लागणार आहेत. जर गुंतवणूक करायची असेल तर पडताळूनच रिस्क घ्या. कुणाच्या तरी सांगण्यावरून गुंतवणूक करू नका. स्ट्रेस आणि बिझी शेड्यूलमुळे त्रस्त व्हाल. तुम्ही सिंगल असाल तर आज एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित व्हाल. प्रेम संबंध जुळण्याची शक्यता आहे. जंक फूडपासून दूर राहा. आज धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. त्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. मुलीच्या प्रगतीमुळे भारावून जाल. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.
आज तुमच्या मेहनतीचं तुम्हाला फळ मिळणार आहे. नव्या उद्योगाची आज सुरुवात करणार आहात. पैशाच्या बाबत आज तुम्ही समृद्धीचा आनंद घ्याल. रिलेशनमध्ये स्पार्क आणण्यासाठी एक दुसऱ्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करा. बर्नआऊटपासून वाचण्यासाठी मध्ये मध्ये ब्रेक घ्या. तणाव दूर करण्यासाठी आवडीच्या अॅक्टिव्हिटी करा. महिलांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. आज तुमच्यावर देवीची कृपा होईल. घरातील सर्व तणाव दूर होईतील. अविवाहीत मुलींच्या विवाहाचं पक्कं होईल.
आजचा दिवस तुम्हाला स्वप्नांच्या दिशेने घेऊन जाणारा आहे. तुमच्या एनर्जीचा लाभ उठवा. आर्थिक निर्णय घेण्यासाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. सिंगल व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. योग केल्याने तुमचा तणाव कमी होणार आहे. गावाला जाण्याचा बेत रद्द होण्याची शक्यता आहे. इच्छा असूनही तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकणार नाही. बायको आज माहेरी जाण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये बॉसचा ओरडा मिळण्याची शक्यता आहे.
तुळ राशीच्या लोकांना आज फिट राहण्यासाठी कसून एक्सरसाईज करावी लागणार आहे. व्यापाऱ्यांना आज अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. छोट्यामोठ्या रिस्क घेऊ नका, नाही तर पुढे त्याचा पश्चात्ताप होईल. अचानक खर्च वाढणार आहेत. शांती आणि समाधान मिळवण्यासाठी मेडिटेशन करा. पार्टनरला तुमच्या मनातील गोष्टी स्पष्ट करण्यासाठी वेळ काढा. घरात वाद होण्याची शक्यता आहे. आज अचानक घरी सासूचं आगमन होईल. दातदुखी वाढण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रचंड त्रास होईल. खाजगी नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे.
नव्या संधी मिळवण्यासाठी तुम्हाला कंबर कसावी लागणार आहे. नाही तर अडचणींचा डोंगर वाढत जाईल. प्रेमप्रकरणातील अडचणवीर प्रामाणिकपणे तोडगा काढा. शिस्तबद्ध पद्धतीने आयुष्य मार्गी लावा. वायफळ खर्च करू नका. धाडसाने पुढे या, तुम्हीही काही तरी करून दाखवू शकता हे जगाला दाखवा. आज धार्मिक स्थळांना भेट देण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला प्रचंड थकवा जाणवेल. अस्वस्थ वाटू लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लगेच डॉक्टरकडे जा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
या राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. नव्या जबाबदाऱ्या घेण्याचा हा योग्य काळ आहे. तुमच्या लग्नाला बरीच वर्ष झाली असली तरी पत्नीसोबत अधिक काळ घालवा. पत्नीला वेळ द्या. काही लोकांना आज राजकीय लाभ मिळण्याची शक्यता आहे. काम आणि पर्सनल लाइफच्या कारणास्तव तणाव वाढू शकतो. जीवनात संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करा.
गर्दीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करू नका. आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी तुमच्या पार्टनरचा सल्ला घ्या. नव्या संधी आणि बदलांना सामोरे जा. तुमचं करिअर अत्यंत उज्ज्वल होणार आहे. तुमचा स्टार जोरात आहेत. तुमच्या पार्टनरच्या गरजा समजून घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. हेल्दी डाएटचं सेवन करा. गावाकडे जाण्याचा योग आहे. मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्यांना परदेशात जाण्याचा योग आहे. तुमचा अडकलेला पैसा आज परत मिळण्याची शक्यता आहे.
आजच्या दिवशी कोणत्याही गोष्टीची विचार करूनच रिस्क घ्या. काही मित्रांचे घरी आगमन होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली झाल्यावरच गुंतवणूक करा. कोणतीही गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागाराची मदत घ्या. कुटुंबातील वादापासून दूर राहा. शेजारणीशी विनाकारण भांडण होईल. आज किचनमध्ये काम करताना सावधानता बाळगा. नोकरदार महिलांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नव्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
आज तुम्हाला अत्यंत सकारात्मक वाटेल. नव्या आव्हानांचा सामना करताना घाबरू नका. विपश्यना आणि योगाद्वारे मानसिक संतुलन चांगलं राखण्याचा प्रयत्न करा. ओम मणि पद्मे हूँचा मंत्र तुम्हाला उभारी देईल. तुमच्या मनातील भावना आज जाहीर करा. नाही तर नंतर वेळ निघून गेलेली असेल. कोणत्याही व्यक्तीशी विनाकारण भांडू नका. दुसऱ्यांच्या भांडणात लक्ष देऊ नका, नाही तर अडचणीत याल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)