ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 1st September 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
आज दिवसभर व्यस्त राहाल. घरातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. त्यांची सल्ला लाभदायक होईल. तुमच्या व्यक्तीमत्त्वात होत असलेला सकारात्मक बदल चर्चेचा विषय होईल. कोणत्याही गोष्टीची घाई करू नका. धैर्य ठेवा. शांततेने काम पूर्ण करा. त्यामुळे चांगला परिणाम मिळेल. तरुणांनो, संकटाच्या काळात बिथरून जाऊ नका. आज ऑफिशियल मिटिंग होईल. त्यात तुमच्या कामाचं कौतुक होईल. पतीपत्नीत आज वाद होतील. प्रेमप्रकरणात गैरसमजामुळे दूरावा निर्माण होईल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.
धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्याकडे तुमचा ओढा वाढेल. तसेच सेवेशी संबंधित क्षेत्रात योगदान द्याल. आज तुमचं अर्धवट काम मार्गी लागेल. मुलांसोबत दिवस घालवाल. व्यवसायात सावध राहा. नाही तर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा. सरकारी नोकरीत ओव्हरटाईम करावा लागेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रेमप्रकरणात पारदर्शकता ठेवा. नाही तर नात्यात वाईटपणा येईल. तुम्हाला आज थकवा जाणवेल. निष्काळजीपणामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
नवीन विषयाची माहिती मिळवण्यात आनंद वाटेल. आर्थिक व्यवहारात सावध राहा. कुणाशीही उधार उसनवारी करू नका. नाही तर आर्थिक नुकसान होऊ शकतं. मुलांच्या नकारात्मक गोष्टीमुळे मन उदास आणि खिन्न होईल. घरातील समस्या शांत डोकं ठेवून सोडवा. नोकरीचा शोध घेणाऱ्यांना अजूनही नोकरीची प्रतिक्षा करावी लागणार आहे. लग्नाळूंना लवकरच आनंदाची बातमी समजेल. वरिष्ठांच्या हस्तक्षेपामुळे घरातील तणाव दूर होईल. घरात वातावरण चांगलं राहील. पार्टनरसोबतचं प्रेम वाढेल. गावाला जाण्याचा योग आहे. शेतीची कामे मार्गी लागतील.
आजचा दिवस चांगला जाईल. कुटुंबाच्या मदतीमुळे तुम्हाला मोठा नफा होणार आहे. तुमच्यासाठी आज ग्रहांची स्थिती चांगली आहे. एखादी महत्त्वाची बातमी मिळेल. लग्नकार्यात भाग घ्याल. रागावर नियंत्रण ठेवा. नाही तर नात्यात बिघाड होईल. घरातील एखाद्या कार्यासाठी लाखो रुपयांची तजवीज करावी लागणार आहे. तरुणांनी कुणाच्याही सल्ल्यावरून चुकीचा निर्णय घेऊ नये. जीवनसाथीला भेट द्याल. पार्टनर एखाद्या कारणावरून नाराज होईल. ॲसिडीटी आणि पेट खराब झाल्याने त्रास होईल. तुमची दिनचर्या बिघडून जाईल. संयमित राहा.
मोठ्या संकटात नातेवाईकांची मोठी साथ मिळेल. त्यामुळे तुमचे मनोबल उंचावले. त्यामुळे तणावातून सुटका होईल. एखादं महत्त्वाचं कार्य आजपासून सुरू कराल. उत्पन्नाचं नवीन साधन सुरू होईल. आरोग्याची काळजी घ्या. वातावरण बदलामुळे तब्येत बिघडेल. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीतील लोकांना अचानक मोठी बातमी ऐकायला मिळणार आहे. आजच तुमच्या गावाकडून तुम्हाला एखादी महत्त्वाची बातमी ऐकायला मिळणार आहे. परदेशात जाण्याचा योग आहे. दूरचा प्रवास टाळा. धार्मिक कार्यात भाग घ्याल. परस्त्रीपासून सावध राहा. नको त्या भानगडीत पडला तर मोठी अडचण होईल.
फोन किंवा ईमेलद्वारे एखादा शुभ समाचार मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सकारात्मक व्हाल. तुम्हाला हायसं वाटेल. काही खास कामे मार्गी लावण्यासाटी करण्यात आलेले प्रयत्न यशस्वी होतील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. समाजात मानसन्मान वाढेल. रविवारचा दिवस असल्याने घरातच राहाल. बाहेर जाण्याचा प्लान रद्द होईल. अचानक घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याला विवाहाचा प्रस्ताव येईल. त्यामुळे घरात धावपळ असेल. अधिक मेहनतीमुळे रक्तदाब वाढेल. त्यामुळे सातत्याने आराम केला पाहिजे.
आजच्या दिवशी तुम्ही एकदम फ्रेश असाल. ज्या कामासाठी तुम्ही इतके दिवस मेहनत घेतली. त्याचं फळ मिळेल. ते काम मार्गी लागेल. अडकलेला पैसा परत मिळणार आहे. आजच्या दिवशी खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे आर्थिक बाबींमध्ये सचेत राहावे लागणार आहे. एखादा निर्णय रद्द केला तर बरं होईल. राजकारणात असलेल्या लोकांनी सजग राहिलं पाहिजे. सरकारी नोकरीतील लोकांना स्पेशल ड्युटी करावी लागणार आहे. एखाद्या व्यावसायिक टूरवर जावं लागू शकतं. चिंतेमुळे मायग्रेनचा त्रास जाणवेल. त्यामुळे खाण्यापिण्यावर ध्यान ठेवा.
एखाद्या धार्मिक कार्याचं प्लानिंग कराल. तीर्थस्थळांना भेटी देण्याची योजना आखाल. पावसाळा संपत आल्याने गावाकडे जाण्याचा योग आहे. गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरू कराल. व्यवसायात झालेलं आर्थिक नुकसान एखाद्या लाभाने अचानक भरून निघेल. नोकरभरती करण्यावर जोर द्याल. सरकारी नोकरदारांना सोमवारपासून चांगला दिवस जाईल. वाहन खरेदीचा योग आहे. प्रेमसंबंधात वितुष्ट येईल. रागावर नियंत्रण टेवा. जीभेवर नियंत्रण टेवा. आज ब्लड प्रेशर आणि मधूमेहाकडे विशेष लक्ष द्या.
मन शांत ठेवा. अध्यात्मात रुची वाढवा. घरातील वातावरण आनंदी राहील. चर्चेतून मार्ग निघतो हे लक्षात ठेवा. पैसा आल्याने खर्चही वाढेल. कधी कधी मनात निराशाजनक विचार येतील. छोट्याश्या गोष्टीमुळे जवळचे मित्र दुरावतील हे लक्षात ठेवा. घरात अडचणी येतील. नव्या व्यवसायाची सुरुवात कराल. नवीन तंत्रज्ञान खरेदी कराल. घरी दु:खद बातमी येईल. तेराव्या कार्यक्रमाला हजेरी लावाल. छातीत दुखू लागेल. वातावरण बदलल्याने तब्येत नरम गरम राहील. काळजी घ्या. जीवनशैली बदला. एखाद्या आंदोलनात भाग घेण्याची शक्यता आहे.
घरातील जबाबदाऱ्या गंभीरपणे पार पाडाल. घरात शिस्तबद्ध वातावरण ठेवाल. तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल होईल. शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. फेरिवाल्याशीही आज वाजण्याची शक्यता आहे. नाक्यावरचा टपरीवाला चारचौघात तुमचा अपमान करेल. पण रागावर नियंत्रण ठेवा. कुणाशीही वाद घालू नका. पती-पत्नी आज भावनिकरित्या जवळ येतील. प्रेयसीसोबत डेटिंगला जाल. आर्थिक झळ बसणार आहे. आरोग्य चांगलं राहील. वातावरण बदलल्याने आळस येईल.
आज अचानक एखाद्या कामामुळे दिनचर्या बदलून जाईल. तुमच्यासाठी ही सुखद बाब असेल. मनात द्विधा स्थिती असेल तर मित्राशी शेअर करा. त्यातून तुम्हाला निश्चितच समाधान मिळेल. तुमच्या स्वभावात संतुलन ठेवा. चांगलं काम मार्गी लावा. भविष्यातील गोष्टींसाठी आताच तरतूद करा. कुणालाही आश्वासन देणअयापूर्वी विचार करा. मालमत्तेत गुंतवणूक करा. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. सरकारी सेवेत कार्यरत असलेले लोक आज त्रस्त असतील. घरात शांततेचं वातावरण असेल. प्रेम संबंधात विश्वास वाढेल. आरोग्य ठिक राहील. दुपारनंतर बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल.
दिवसाची सुरुवात चांगली राहील. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचं बळ मिळेल. घरातील कामांना तुम्ही आज प्राधान्य द्याल. आईसोबत बाहेर फिरायला जाल. ऐनवेळी मित्र मदतीला धावून येतील. कामातील सहकाऱ्याची खूप मदत होईल. मित्रांसोबत लस्सी पार्टी कराल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. संध्याकाळ नंतर भावूक व्हाल. वडिलांची आठवण येईल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. जास्त खोटं बोलू नका. नाही तर एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलावं लागेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)