आजचे राशी भविष्य 20h August 2024 : प्रेमात धोका मिळणार… पण कुणाला? तिला की त्याला?; ही कुणाची रास?

| Updated on: Aug 20, 2024 | 7:30 AM

Horoscope Today 20th August 2024 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.

आजचे राशी भविष्य 20h August 2024 : प्रेमात धोका मिळणार... पण कुणाला? तिला की त्याला?; ही कुणाची रास?
Follow us on

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 20th August 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

सामाजिक कार्यात भाग घ्याल. दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांसोबत सलोख्याचे संबंध टेवा. व्यवसायात सवकाश प्रगती होईल. नोकरीचा शोध थांबेल. प्रेमसंबंधात तणाव निर्माण होतील. जीभेवर नियंत्रण ठेवा. एकाचवेळी अनेक भानगडी त्रासदायक ठरू शकतात. आज तुमची एखादी मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. पती-पत्नीत मतभेद होण्याची शक्यता आहे. लवकरच एखादी खूश खबर मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

आज कुटुंबात एखाद्या विषयावर चर्चा होईल. कोणतंही काम करताना आधी बजेट तयार करा, नंतरच निर्णय घ्या. नाही तर अडचणींचा सामना करावा लागले. मालमत्तेची प्रकरणे डोकं थंड ठेवून मार्गी लावा. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. या चोरी होण्याची शक्यता आहे. तणावापासून दूर राहा. नवरा-बायकोंमधील भावनात्मक संबंध मजबूत होईल. मनोरंजन आणि शॉपिंग आदी कार्यात मन व्यस्त राहील. कामावरील कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवा.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

लक्ष्य गाठण्यासाठी कठोर मेहनत करावी लागणार आहे. आज तुमचा उत्साह अधिकच वाढेल. तुमचं एखादं स्वप्न साकार होणार आहे. एखाद्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. तुमच्या तापट स्वभावामुळे संबंध बिघडतील. त्यामुळे स्वभाव सकारात्मक ठेवा. शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. गर्दीच्या ठिकाणी टाळा. शांत राहा आणि मेडिटेशन करा. घरात लक्ष द्या. कुटुंबाला वेळ द्याल.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आज आंददायक दिनचर्या राहील. तुमचं कार्य व्यवस्थित पार पाडाल. केवळ डोक्यानेच विचार करू नका, अंतरात्म्यातील आवाजालाही महत्त्व द्या. एखाद्या मित्रासोबत वाद झाले असतील तर ते दूर करा. कौटुंबिक कार्यात व्यस्त राहाल. आज नवीन कार्याला सुरुवात कराल. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. एखाद्या नवीन कार्याला सुरुवात करण्यासाठी अनुकूल दिवस नाहीये. तुमची कामाची पद्धत जाहीर करू नका. घरात आनंदी वातावरण राहील. तब्येत चांगली राहिल. मात्र महिलांना तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

तुमच्या हस्तक्षेपामुळे घरातील एखादा वाद संपुष्टात येईल. त्याचा सकारात्मक परिणाम होईल. तुम्ही कुणाला पैसे उधार दिलेले असतील तर ते आज मिळण्याची शक्यता आहे. रागामुळे नाती बिघडतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात आळस करू नका, नाही तर आळसामुळे व्यवसाय बुडेल. आरोग्य ठिक राहील. मात्र त्वचेसंबंधातील अॅलर्जी होईल.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

काही अडचणी येतील. पण प्रयत्न करत राहा, यश नक्कीच मिळेल. दुसऱ्यांचं ऐकून निर्णय घेऊ नका. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, योग्य न्याय मिळेल. कोणत्याही वादात रागावर नियंत्रण ठेवा. शांततेने समस्या मार्गी लावा. घरातील वातावरण आनंदी राहील. चुकीच्या संबंधामुळे जीवनातही हालचाली होतील. थकवा जाणवेल. तणावामुळे आरोग्यावर परिणाम होईल. ब्लड प्रेशर आणि डायबिटीज असलेल्या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. वेळीच डॉक्टरला दाखवा. दूरचा प्रवास संभवतो. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना नवा जॉब मिळण्याची शक्यता आहे.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

पुरुषांना प्रेमात धोका मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपून राहा. डेटिंगला जाताना आधी खिशाकडे पाहा, नाही तर फजिती व्हायची. आज नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या भेटीगाठी घ्याल. बऱ्याच दिवसानंतर अनेकांना भेटल्याने तणाव मुक्त व्हाल. मन प्रसन्न राहील. सर्व चुकीची कामे सोडाल. पोटाचा विकार डोकं वर काढेल. गॅसेसच्या त्रासामुळे प्रचंड वैतागाल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यापारात मोठी डील होण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात दणकून फायदा होईल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

आज महत्त्वाच्या लोकांसोबत गाठीभेटी होतील. घर आणि व्यवसायात चांगला समन्वय साधाल. मालमत्तेचं प्रकरण अडकलेलं असेल तर ते आज मार्गी लागेल. सोसायटीतील कामकाजात भाग घ्याल. भावांशी असलेला अबोला कायम राहील. बहिणीसाठी खरेदी कराल. धैर्य आणि संयम ठेवण्याचा आज दिवस आहे. नात्यातील वादात पडू नका. नाही तर तुम्हील खलनायक व्हाल. कुणालाही उधार देऊ नका. उधार दिलेला पैसा येण्याची शक्यता फार कमी आहे. अनाथ मुलांसाठी आज मोठं काम कराल. भिकाऱ्यांना मदत कराल. बायकोला अचानक सरप्राईज गिफ्ट द्याल.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

आजचा दिवस शांत आणि समाधानकारक असेल. भावांबरोबरचे संबंध अतिशय मधूर राहील. अविवाहितांना स्थळ सांगून येईल. बायकोचा सल्ला ऐकल्याने आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नवऱ्यांच्या उधळ्या स्वभावाला आवर घाला. नवरा बायकोत वाद होतील. मीडिया आणि ग्लॅमरशी संबंधित लोकांसाठी चांगला दिवस आहे. प्रेमभंगामुळे नैराश्य येईल. व्यसनाच्या नादी लागू नका, नाही तर आयुष्यातून उठाल. गावाला जाण्याचा योग आहे. शेतीची कामे मार्गी लागतील.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

तुमच्या मनासारख्या सर्व गोष्टी होतील. तुमचं कौशल्या दाखवून देण्याची ही वेळ आहे. एखाद्या मित्राच्या सल्ल्याने तुम्ही महत्त्वाचा निर्णय घ्याल. तुमचा अधिक वेळ घराबाहेर जाईल. दाम्पत्य जीवनात काहीही इगो ठेवू नका. एकमेकांना समजूनच पुढे जा. त्यातच फायदा आहे. शेजाऱ्यासोबत वाद होईल. जुनी प्रकरण मागे लागतील. त्यामुळे मनस्ताप होईल. गावाकडे जाऊ नका, वेळ वाया जाईल. कामाच्या ठिकाणी प्रचंड त्रास सहन करावा लागेल. लग्नाळूंचे आज लग्न जमण्याचे योग आहेत. साखरपुडा होण्याची शक्यता आहे.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

मागच्या चुका आता डोकं वर काढणार आहेत. त्यामुळे या चुकांना सामोरे जाण्याची मनाची तयारी ठेवा. इगो आणि आक्रमकतेवर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस थोडा जीभेला लगामच घाला. वातावरण बदलल्याने तब्येतीवर परिणाम होईल. बायकोच्या नात्यातील व्यक्तीकडून आर्थिक लाभ होईल. नोकरदार महिलांना आज नोकरीत लॉटरी लागेल, पदोन्नती होण्याची शक्यता आहे. गावाकडून दु:खद निरोप येण्याची शक्यता आहे. मेडिटेशन आणि योगा करा. तुमचं मन स्थिर होईल. नवीन पुस्तक वाचायला घ्याल. कोर्टकचेरीचं प्रकरण मागे लागेल.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

तुम्ही सकारात्मक आहात. त्यामुळे तुम्ही या सकारात्मकतेतून प्रश्न मार्गी लावाल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. समाजात मानसन्मान वाढेल. झोपेचा त्रास उद्भवेल. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात कुणाचा तरी सल्ला घेऊनच निर्णय घ्या. आर्थिक प्रकरणात कुणावरही भरवसा ठेवू नका. घरात शांतता ठेवणं हे तुमच्या हातात आहे. त्यामुळे घरातील शांतता ठेवण्यावर भर द्या. तुमची बाहेरची प्रकरणं त्रास देतील. गावाकडे जाण्याचा योग आहे. सर्दी, पडसं होण्याची शक्यता आहे. थंडपेय घेणं टाळा. गॅसेसचा प्रचंड त्रास जाणवेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)