ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 31st August 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
आज तुमचं नशीब जोरावर आहे. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. गोड बातमी मिळण्याचे संकेत आहेत. महत्त्वाचं लक्ष्य साधण्यात यश मिळेल. विभिन्न कार्यात तेजी येईल. तुमच्या प्रयत्नांमुळे सर्वांना प्रभावीत करून सोडाल. संकोच दूर होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. भावनेच्याभरात कोणताही निर्णय घेऊ नका. दुसऱ्यांवर टीकाटिप्पणी करण्यात वेळ वाया घालवू नका. आज जीवनसाथीसोबत ऑनलाईन शॉपिंग कराल. तरुणांशी मैत्री होईल. दाताची कवळी बदलून घ्या.
आज मेहनतीचं फळ मिळण्याचा दिवस आहे. जमीन किंवा वाहनाशी संबंधित काम मार्गी लागेल. तुमचं लक्ष्य पूर्ण करण्यावर भर द्या. पर्सनल लाईफबाबत कोणतीही रिस्क घेऊ नका. तुमच्या पर्सनल लाइफबाबत कुणालाही बोलू नका. पती पत्नीच्या दरम्यानचे संबंध चांगले राहतील. प्रेमप्रकरणात तणाव वाढेल. तुमच्या पार्टनरच्या भावनांचा सन्मान करा. आरोग्य उत्तम राहील. नोकरीत मोठा फायदा होईल. व्यावसायिकांना आज मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही गुंतवणूक करताना चार वेळा विचार करा.
सर्व ग्रह आज तुमच्याबाजूने आहे. भाग्य आज तुमच्या घरी पाणी भरेल. पण तुम्ही आळशी असाल तर तुम्ही दुसऱ्याच्या घरी पाणी भराल. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात गुंतवून घ्याल. या कामामुळे मनाला प्रसन्नता वाटेल. आत कोणत्याही प्रकारचा ताण तणाव जाणवणार नाही. उसनवारीत पडू नका. उद्योगात नवीन करार करावे लागतील. पण अटी शर्ती आवर्जून वाचून घ्याल. नोकरीचा शोध घेणाऱ्यांना आज चांगला दिवस आहे. आमवाताचा त्रास जाणवेल. दाम्पत्य जीवनात माधुर्य निर्माण होईल. प्रेमसंबंधातही आनंदाची बातमी मिळेल.
या राशीच्या लोकांचा प्रगतीचा काळ सुरू झाला आहे. फक्त तुम्हाला तुमच्या कामाचा प्रत्येक अंगाने विचार करावा लागणार आहे. थोडेथोडके लाभ होतील. मुलाबाळांच्या करिअरची चिंता सतावेल. बुजुर्गांनी सावध राहावं. व्यवसायात अनेक संधी मिळणार आहेत. त्या संधींचं सोनं कसं करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. नोकरीच्या व्यतिरिक्त पार्ट टाईम जॉब करण्याचा विचार कराल. घरात आनंददायी वातावरण असेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. थकवा जाणवेल. अशक्तपणा जाणवेल. अनोळखी व्यक्तीच्या नादी लागू नका, नाही तर नुकसान होईल.
सामाजिक आणि व्यक्तीगत कार्यात व्यस्त राहाल. पक्ष बदललेल्या राजकीय लोकांसाठी वाईट काळ सुरू होणार आहे. मालमत्तेसंबंधातील वाद सुटणार आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळेल. आर्थिक व्यवहारात आज चुका कराल. तुमची व्यक्तीगत कामे पूर्ण करण्यासाठी कुणावर विश्वास टाकू नका. कौटुंबीक वातावरण आनंदी राहील. आर्थिक अडचणी वाढल्याने मन उदास होईल. डिप्रेशन सारखी स्थिती उद्भवेल. मेडिटेशन आणि योगावर भर द्या. आज नव्या व्यक्तीशी मैत्री होईल. कुणाच्या तरी प्रेमात पडाल.
मालमत्तेसंबंधातील एखादं काम मार्गी लागेल. अडलेलं एखादं काम मार्गी लागेल. तुमच्या बजेटकडे दुर्लक्ष करू नका. खर्च करताना या गोष्टीकडे लक्ष द्या. लस्सी विक्रेत्यांना आज भरपूर लाभ होणार आहे. मार्केटिंग संबंधित कामांकडे लक्ष द्या. एखाद्या बड्या राजकीय नेत्याशी वा अधिकाऱ्याची भेट होईल. या भेटीचा मोठा फायदा होणार आहे. तणाव आणि चिंतेच्या कारणआने निद्रानाशाचा त्रास होईल. झोप उडाल्याने मेडिटेशनवर भर द्या. दाम्पत्य जीवनात सर्व काही अलबेल असेल.
मित्रांसोबत भेट होईल. मालमत्तेशी संबंधित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यावर अधिक फोकस ठेवा. उत्साहाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नाही तर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू नका. तुमचा अनुभव काय सांगतो त्यावरून निर्णय घ्या. रिअल इस्टेट बिझनेसमध्ये फायदा होईल. गावाकडे जाण्याचा योग आहे. प्रदूषित भागात जाऊ नका. नाही तर इन्फेक्शन होईल. खोकला आणि सर्दी होण्याची शक्यता आहे.
आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. समान विचारधारेच्या लोकांसोबत चर्चा होईल. त्यामुळे विचारांचं अदानप्रदान होईल. ही वेळ मेहनत करण्याची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फिरणं टाळून कामावर फोकस ठेवावा. एखाद्या बाहेरच्या व्यक्तीमुळे घरातील व्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. सावधान राहा, त्याचा परिणाम तुमच्या दाम्पत्य जीवनावर होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्येतून मुक्ती मिळेल.
ग्रह स्थिती अनुकूल आहे. तुमचं वर्चस्व दाखवण्याची उत्तम वेळ आहे. एखादी महत्त्वाची सूचना मिळेल. सामाजिक आणि राजकीय कार्यात महत्त्व वाढेल. तुम्ही एखाद्या कायदेशीर प्रकरणात अडकू शकता. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन करा. कोणतीही मोठी गुंतवणूक करताना चांगली चौकशी करा. कोणत्याही प्रकारचा प्रवास स्थगित करा. पती पत्नीतील संबंध सुमधूर असतील. सध्याच्या बदलत्या हवामानामुळे अलर्जी होईल. त्यामुळे अडचणी वाढतील. पोटात इन्फेक्शन होईल. व्यापारात कर्मचाऱ्यांची साथ मिळेल. नवीन गोष्टी अंमलात आणण्याचा प्रयत्न करा.
एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला भेटल्यावर आनंद वाटेल. कोर्टात काही प्रकरण सुरू असेल तर त्याचा सकारात्मक परिणाम येईल. तुमच्या निष्काळजीपणामुळे काही अडचणी येऊ शकतात. कोणत्याही गोष्टीवर विचार न करता विश्वास ठेवू नका. सोशल मीडियात फालतू वेळ घालवू नका. व्यावसायिक कामाच्या निमित्ताने जवळचा प्रवास होऊ शकतो. सध्याचा काळ फार लाभदायक नाहीये. आयुष्यात फार काही घडताना दिसत नाही. पण निराश होऊ नका. काम करत राहा, यातूनच फळ मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आज खरेदी करण्याचा योग आहे. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू नका. नाही तर आर्थिक झळ पोहोचेल.
आज बरेच खर्च डोळ्यासमोर येतील. त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होईल. देणेकरी तगादा लावतील. कुणाची उधार उसनवारी असेल तर देऊन टाका. कुणाच्याही व्यक्तिगत गोष्टीत लक्ष घालू नका. नाही तर तुम्हालाच त्याचे परिणाम भोगावे लागतील. जीभेवर नियंत्रण ठेवा. शेजाऱ्याशी वाद घालू नका. रागावर नियंत्रण ठेवा. आज जेवढे शांत राहाल, तेवढा तुमचा फायदा होणार आहे. काही लोक तुमच्याबद्दलच्या चुकीच्या अफवा पसरवतील. त्याने पॅनिक होऊ नका. विवाह बाह्य संबंधामुळे बदनामी होईल. घरातील सदस्याच्या आजारपणाकडे कानाडोळा करू नका.
घरातील एखाद्या धार्मिक कार्यात भाग घ्याल. एखादी योजना अंमलात आणाल. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. आज काही चढउतार पाहायला मिळतील. नोकरीतील अधिकारी वर्ग आज खूश राहील. कुटुंबातील वातावरण चांगली राहील. वैवाहिक जीवनात संभ्रम निर्माण होऊ देऊ नका. लग्नाळूंना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. गावाला जाण्याचा योग आहे. दूरचा नातेवाईक भेटायला येईल. आजपासून तुमचा भाग्योदय सुरू होत आहे. तुमच्या आयुष्यात आज एखादी व्यक्ती येण्याची शक्यता आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)