आजच्या बदलत्या काळात, धकाधकीच्या जीवनामुळे आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे अनेकांच्या स्वभावात चिडचिडेपणा (anger) वाढत चालला आहे, शिवाय आपल्या आजूबाजूला असे अनेक लोकं असतात ज्यांना गरजेपेक्षा जास्त राग येतो. अशा लोकांना राग येण्यासाठी कुठलेच मोठे कारण लागत नाही. जर तुम्हीही अशा लोकांमध्ये सामील असाल तर त्याचा संबंध ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही पाहता येईल. ज्योतिषशास्त्रीय (anger) दृष्टीकोनातून पाहिले तर ते ग्रह दोषांशी देखील संबंधित असू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार रागाचा संबंध फक्त वर्तन आणि मनाशी नसून राहू आणि मंगळ दोषामुळे व्यक्तीला अधिक राग येतो. तथापि, यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत, ज्याद्वारे तुम्ही ग्रहांचे वाईट प्रभाव कमी करून रागावर नियंत्रण मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल.
ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्हाला जास्त राग येत असेल तर चंदनाचा वापर करा. चंदन केवळ तुमचे मन शांत ठेवत नाही तर त्याच्या वापराने राहू दोषापासूनसुद्धा आराम मिळतो.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)