Astrology facts: हिंदू धर्मात मुहूर्ताला इतके महत्व का?; शुभ मुहूर्तावरच कार्य का केले जाते?

| Updated on: Jun 12, 2022 | 7:00 PM

हिंदू धर्मात (hindu religion) कोणतेही शुभ आणि मंगल कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्ताचा (Importance of muhurta) विचार केला जातो. असे मानले जाते की शुभ मुहूर्तावर  केलेले कोणतेही कार्य किंवा अनुष्ठान नेहमीच यशस्वी होते, आणि त्याचे चांगले परिणाम प्राप्त होतात. याचमुळे हिंदू धर्मात  कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य, धार्मिक विधी, पूजा, विवाह, गृहप्रवेश इत्यादींसाठी शुभ मुहूर्ताबद्दल ज्योतिषी किंवा […]

Astrology facts: हिंदू धर्मात मुहूर्ताला इतके महत्व का?; शुभ मुहूर्तावरच कार्य का केले जाते?
Follow us on

हिंदू धर्मात (hindu religion) कोणतेही शुभ आणि मंगल कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्ताचा (Importance of muhurta) विचार केला जातो. असे मानले जाते की शुभ मुहूर्तावर  केलेले कोणतेही कार्य किंवा अनुष्ठान नेहमीच यशस्वी होते, आणि त्याचे चांगले परिणाम प्राप्त होतात. याचमुळे हिंदू धर्मात  कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य, धार्मिक विधी, पूजा, विवाह, गृहप्रवेश इत्यादींसाठी शुभ मुहूर्ताबद्दल ज्योतिषी किंवा पंडितांचा सल्ला घेतात. शुभ मुहूर्त म्हणजे कोणतेही नवीन कार्य किंवा शुभ कार्य सुरू करण्याची वेळ, ज्या दरम्यान सर्व ग्रह आणि नक्षत्र चांगल्या स्थितीत असल्याने शुभ परिणाम प्रदान करतात. मुहूर्त शास्त्राच्या अभ्यासाने जीवनातील शुभ कार्य सुरू करण्याची वेळ आणि तारीख निश्चित केली जाते. यालाच मुहूर्त म्हणतात. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सर्व प्रकारचे शुभ आणि मंगल कार्य सुरू करण्यासाठी एक निश्चित वेळ आहे, कारण ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचाली प्रत्येक वेळी बदलत असतात. यात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही हालचालींचा समावेश आहे. ग्रह-नक्षत्रांच्या सकारात्मक हालचालींच्या आधारे शुभ मुहूर्त ठरवला जातो.

मुहूर्त काढण्याची पद्धत

जीवनात येणार्‍या समस्या आणि त्यांच्या अनुकूल व प्रतिकूल काळ जाणून घेणे, त्यांना प्रतिकूल परिस्थितीतून वाचवणे आणि अनुकूल परिस्थितीचा लाभ घेण्यास सक्षम बनवणे हे हा मुहूर्त कडण्यामागचा उद्देश असतो. कोणत्याही व्यक्तीने शुभ मुहूर्तावर काम सुरू केले तर त्याच्या पदरी नक्कीच यश पडते, याउलट मुहूर्त चांगला नसेल तर त्याचे चांगले फळ मिळत नाही. कधी-कधी त्याचे अनिष्ठ फळंही मिळतात. दिवस आणि रात्र मिळून एकूण 30 मुहूर्त असतात.

शुभ मुहूर्ताचे प्रकार

अभिजित मुहूर्त- सर्व मुहूर्तांमध्ये अभिजित मुहूर्त अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. अभिजित मुहूर्त दररोज दुपारच्या सुमारे 24 मिनिटे आधी सुरू होतो आणि दुपारनंतर 24 मिनिटांनी संपतो.

हे सुद्धा वाचा

चोघडिया मुहूर्त-  मुहूर्ताला शास्त्रात विशेष स्थान आहे. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही शुभ आणि मंगल कार्यासाठी शुभ मुहूर्त नसेल तर अशावेळी ते कार्य चोघडिया मुहूर्तावर करता येते.

होरा- एखादे शुभ कार्य करणे खूप महत्वाचे असेल पण पाहिजे तास शुभ मुहूर्त मिळत नसल्यास ज्योतिषशास्त्रात होरा चक्राची व्यवस्था करण्यात आली आहे.

गौरी शंकर पंचांगम- गौरी शंकर पंचांगम याला नल्ला नेरम म्हणूनही ओळखले जाते ज्याचा अर्थ शुभ काळ आहे. हा मुहूर्त खूप फलदायी आहे.

गुरु पुष्य योग- जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्राचा संयोग तयार होतो तेव्हा त्याला गुरु पुष्य योग म्हणतात. सर्व योगांमध्ये गुरु पुष्य योग हा मुख्य आहे. या योगात केलेली प्रत्येक गोष्ट शुभ असते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)