Guru Chandal Yog : ऑक्टोबर महिन्यात गुरु राहुची युती तुटणार, या राशींसाठी सुरु होणार ‘अच्छे दिन’

| Updated on: Oct 02, 2023 | 5:16 PM

Astrology 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, राहु आणि गुरुची सर्वात दीर्घकाळ असलेली युती आता संपुष्टात येणार आहे. राहुसोबतची संगत सुटणार असल्याने तीन राशीच्या जातकांना चांगली फळं मिळतील. चला जाणून घेऊयात याबाबत सविस्तर

Guru Chandal Yog : ऑक्टोबर महिन्यात गुरु राहुची युती तुटणार, या राशींसाठी सुरु होणार अच्छे दिन
Guru Chandal Yog : अशुभ असा गुरु चांडाळ योग थोड्याच दिवसात संपणार, या राशींच्या मार्गातील अडथळे होणार दूर
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या मेष राशीत राहु आणि गुरुची अभद्र युती सुरु आहे. ही अत्यंत अशुभ अशी युती गणली जाते. या युतीला गुरु चांडाळ योग असं म्हंटलं जातं. यामुळे जातकांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. मेष राशीतील राहुचा दीड वर्षाचा कालावधी आता संपुष्टात येणार आहे. राहुल 30 ऑक्टोबरला वक्री मार्गाने मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मेष राशीतील राहु आणि गुरुची युती संपुष्टात येईल. यामुळे राशीचक्रावर सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. तसेच तीन राशीच्या जातकांना अकस्मात धनलाभ होईल. चला जाणून राशीचक्रातील तीन लकी राशींबाबत सविस्तर

या तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ

तूळ : गुरु चांडाळ योग या राशीच्या सप्तम स्थानात तयार झाला होता. त्यामुळे वैवाहिक जीवनावर राहु आणि गुरुची वक्रदृष्टी पडली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वैवाहिक जीवनात असलेला तणाव दूर होणार आहे. तसेच करिअरमध्ये नवीन संधी चालून येतील. तसेच मनासारख्या काही गोष्टी घडून येतील. समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. तसेच भागीदारीच्या धंद्यात अपेक्षित यश मिळेल. अविवाहित लोकांना चांगले प्रस्ताव येऊ शकतात.

कर्क : या राशीच्या दशम स्थानाता राहु आणि गुरुची युती आहे. त्यामुळे व्यवसायात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता या अडचणी दूर होतील. तसेच बेरोजगार तरुणांना अपेक्षित नोकरी मिळू शकतो. प्रमोशनची संधी चालून येईल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. त्याचबरोबर कुटुंबासोबत देवदर्शनाचा योग जुळून येईल.

सिंह : या राशीच्या नवम स्थानात गुरु चांडाळ योग तयार झाला होता. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास जात होता. आता तसं होणार नाही. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. उत्पन्नात वाढ होईल. तसेच रोजगाराच्या नवीन संधी चालून येतील. वडिलांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन लाभेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)