अधिकमासात शनि शुक्रामुळे तयार होतोय अशुभ असा ‘खप्पर योग’, 30 दिवस या राशींचं टेन्शन वाढणार

| Updated on: Jul 19, 2023 | 6:29 PM

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीमुळे शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होत असते. सध्या अधिकमास सुरु असून यात शनि आणि शुक्राची स्थिती तीन राशींची डोकेदुखी वाढवणार आहे.

अधिकमासात शनि शुक्रामुळे तयार होतोय अशुभ असा खप्पर योग, 30 दिवस या राशींचं टेन्शन वाढणार
शनिदेव
Follow us on

मुंबई : चंद्रमास आणि सौरवर्ष यांच्यातील फरक भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी अधिक मास येतो. यंदा श्रावण अधिक मास आला आहे. 18 जुलैपासून अधिक मासाला सुरुवात झाली असून 16 ऑगस्टला संपुष्टात येईल. या महिन्यात लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य शुभ योग तयार होत आहे. शुक्र आणि शनिच्या विचित्र स्थितीमुळे अशुभ योगही तयार होत आहे. पाच बुधवार, पाच गुरुवारांसह शुक्र आणि शनिच्या वक्री स्थितीमुळे खप्पर योग तयार होत आहे. हा योग 30 दिवस राशीचक्रावर परिणाम घडवून आणणार आहे. तीन राशीच्या जातकाना या काळात जपून राहावं लागणार आहे. कारण शनिच्या फेऱ्यात आला की काहीच खरं नसतं.

या राशीच्या जातकांनी राहावं सावध

कर्क : खप्पर योगामुळे या राशीच्या जातकांना सावध राहावं लागेल. कारण शनिची अडीचकी सुरु आहे. त्यात शनिच्या वक्री दृष्टीमुळे अडचणीत वाढ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा पैसा पाण्यासारखा खर्च होईल. इतकंच काय तर भविष्यासाठी सांभाळून ठेवलेली पुंजीही जाईल. कामाच्या ठिकाणी वाद निर्माण होईल. त्यामुळे नोकरीवर गदा येऊ शकते. इतकी वर्षे कमावलेला मान एका झटक्यात संपुष्टात येईल. त्यामुळे काळजी घ्या आणि वाणीवर नियंत्रण ठेवा.

कन्या : या राशीचे जातकही खप्पर योगाच्या फेऱ्यात येणार आहेत. त्यामुळे जोडीदारासोबत विनाकारण वाद होतील. कदाचित वाद टोकाला जाऊ शकतात. घराचं आर्थिक बजेट या काळात कोलमडून जाईल. केलेल्या व्यवहारात दगाफटका होऊ शकतो. भविष्याच्या दृष्टीकोनातून जुळवलेलं आर्थिक गणित विस्कटून जाईल. काही कळायच्या आतच बऱ्याच घडामोडी घडतील. त्यामुळे शांत डोक्याने विचार करा आणि सावधपणे पावलं उचला.

मीन : या राशीच्या जातकांना साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यात शनि आणि शुक्राची स्थिती जातकांना त्रासदायक ठरेल. घेतलेल्या कामात खोडा पडत असल्याचं दिसून येईल. कोणतंच काम वेळेत होणार नाही. तसेच केलेल्या कामाला किंमत उरणार नाही. या काळात गाडी सावधपणे चालवा. अपघात होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्या. नोकरी करणाऱ्या जातकांना कामाच्या ठिकाणी आणखी लोड येऊ शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)