मुंबई : गाढ झोपेत असताना एखादे स्वप्न पडणे ही अतिशय सामान्य बाब आहे. काही स्वप्ने झोपेतून जागे झाल्यानंतरही आपल्या लक्षात राहतात, तर काहींचा आपल्याला त्वरित विसर पडतो. काही स्वप्नांचा संबंध आपल्या जीवनाशी असतो, तर काही स्वप्नांचा अर्थ आपण लाऊ शकत नाही. मनोविज्ञानाच्या मते, आपल्या अंतर्मनातील विचार स्वनांच्या रूपाने आपल्या समोर येत असतात. काही स्वप्ने चांगली असतात, तर काही स्वप्ने मन अस्वस्थ करणारी, किंवा मनामध्ये भीती उत्पन्न करणारी असतात. काही तज्ञांचे मत विचारात घेतले, तर त्यांच्या मतानुसार प्रत्येक स्वप्नाला काही ना काहीतरी अर्थ असून, प्रत्येक स्वप्न (Marriage Dream) कुठल्यातरी गोष्टीचे सूचक आहे. त्यामुळे आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांवरून आपल्या आयुष्यामध्ये पुढे काही आनंदाची बातमी समजणार आहे, किंवा पडलेले स्वप्न कुठल्या धोक्याचा इशारा आहे हे जाणून घेता येणे शक्य आहे.
तुम्ही अविवाहित असाल आणि तुम्हाला झोपेत लग्नाचं स्वप्न येत असेल. तर हे एक शुभ चिन्ह आहे असे मानण्यात येते आणि याचा अर्थ असा आहे की आपण नातेसंबंध, व्यवसायात वचनबद्धता देणार आहात.
स्वप्न शास्त्रानुसार लव्ह पार्टनरसोबत लग्नाचे स्वप्न पडले तर ते शुभ संकेत आहे. तसेच याचा अर्थ असा आहे की, तुम्ही तुमच्या नात्याचे लग्नात रूपांतर करणार आहात. तसेच, जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तर तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल.
जर तुम्हाला लग्नाच्या तयारीची स्वप्ने पडत असतील तर ते चांगले लक्षण नाही असे सांगितले आहे. म्हणजे येत्या काही दिवसांत तुम्हाला मानसिक चिंता वाटू शकते. तणावही असू शकतो. किंवा तुम्हाला करिअर आणि व्यवसायात नुकसान सहन करावे लागू शकते.
जर तुम्ही तुमच्या प्रेमी जोडीदाराशिवाय इतर कोणाशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत असाल तर याचा अर्थ तुमचे सध्याच्या नात्यात फारसे समाधानी नाही आहात. तसेच, ज्याच्यासोबत तुम्ही स्वप्न पाहिले आहे त्याच्याशी तुमची मानसिकता जुळते आहे. म्हणूनच तुम्हाला त्याच्याशी लग्न करायचे आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)