मुंबई : दर महिन्याला कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते. यावेळी कार्तिक महिन्यातील कालाष्टमी (Kalashtami) 5 डिसेंबर रोजी आहे. हा उत्सव कालभैरव देवाला समर्पित आहे. या दिवशी काल भैरव देवाची विशेष पूजा केली जाते. तसेच तंत्र शिकणारे लोक कालाष्टमीच्या दिवशी काल भैरव देवाची पूजा करतात. कालभैरव देव साधकाला अपेक्षित परिणाम प्रदान करतात. कालभैरव देवाची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. जर तुम्हालाही कालभैरव देवाची कृपा मिळवायची असेल तर कालाष्टमी तिथीला तुमच्या राशीनुसार दान करा.
मेष : मेष राशीच्या लोकांनी काळभैरव देवाची कृपा मिळवण्यासाठी कालाष्टमीला तिखट, मसूर आणि गुळाचे दान करावे.
वृषभ : कालाष्टमीच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी साखर, मीठ, मैदा, दूध, रवा इत्यादी वस्तूंचे दान करावे.
मिथुन : मिथुन राशीच्या लोकांनी कालाष्टमीला मूग, हिरव्या भाज्या, हंगामी हिरवी फळे इत्यादींचे दान करावे.
कर्क : कर्क राशीच्या लोकांनी कालाष्टमीला तांदूळ, साखर, दूध इत्यादींचे दान करावे. या दिवशी तुम्ही खीर बनवून एखाद्या गरजू व्यक्तीला खाऊ शकता.
सिंह : सिंह राशीच्या लोकांनी कालाष्टमी तिथीला गूळ, मध आणि लाल वस्त्र दान करावे.
कन्या : कालाष्टमीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी विवाहित महिलांना हिरव्या बांगड्या द्याव्यात. याशिवाय गोठ्यात चाऱ्यासाठी पैसेही देऊ शकता.
तूळ : तूळ राशीच्या लोकांनी काळभैरव देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी कालाष्टमीच्या दिवशी गरीबांना पांढरे वस्त्र दान करावे.
वृश्चिक : कालाष्टमीच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी काळभैरव देवाला लाल रंगाची मिठाई अर्पण करावी आणि मंदिर परिसरात उपस्थित लोकांना वाटावी.
धनु : धनु राशीच्या लोकांनी कालाष्टमीला पिवळ्या रंगाची फळे, बेसन, हरभरा डाळी इत्यादींचे दान करावे.
मकर : मकर राशीच्या लोकांनी कालाष्टमीच्या दिवशी संपूर्ण उडीद, घोंगडी आणि काळ्या रंगाचे कपडे दान करावे.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांनी काळभैरव देवाची कृपा मिळवण्यासाठी कालाष्टमीला चामड्याचे जोडे आणि चप्पल दान कराव्यात.
मीन : मीन राशीच्या लोकांनी काळभैरव देवाला प्रसन्न करण्यासाठी कालाष्टमीला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. यानंतर मंदिर परिसरात प्रसाद म्हणून वाटप करा. केशरयुक्त दूध भाविकांना वाटण्यात यावे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)