देशातल्या या नदीला मानले जाते शापित नदी, पाण्याला स्पर्श करायलाही लोकं घाबरतात

| Updated on: Jul 20, 2023 | 11:52 AM

सर्व नद्यांमध्ये एक अशी नदी आहे, जिच्या पाण्याला लोक स्पर्श करायलाही घाबरतात (cursed river) . या नदीचे पाणी पिणे तर दूरच, तीच्या जवळही जाण्याचे कोणी साहस करत नाही. तीला शापित नदी म्हणून संबोधले जाते.

देशातल्या या नदीला मानले जाते शापित नदी, पाण्याला स्पर्श करायलाही लोकं घाबरतात
कर्मनाशा नदी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात भारतीय नद्यांना मातेचा दर्जा देण्यात आला आहे. धर्मग्रंथात नद्यांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले गेले आहे. एवढेच नाही तर वाहत्या नदीत दिवे दान करण्याचीही परंपरा आणि धार्मिक महत्त्व आहे. असे म्हणतात की विशिष्ट दिवशी नद्यांमध्ये स्नान केल्यास पाप नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते. भारतातील अशा काही नद्या खूप जुन्या आहेत आणि त्यांच्याशी संबंधित कथा आजही लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार पवित्र नद्यांचे पाणी पूजा आणि शुभ कार्यात वापरण्याची परंपरा आहे. त्यांचे धार्मिक महत्त्वही सांगितले आहे. या सर्व नद्यांमध्ये एक अशी नदी आहे, जिच्या पाण्याला लोक स्पर्श करायलाही घाबरतात (cursed river) . या नदीचे पाणी पिणे तर दूरच, तीच्या जवळही जाण्याचे कोणी साहस करत नाही. या नदीबद्दल जाणून घेऊया.

काय आहे या नदीचे नाव?

उत्तर प्रदेशमध्ये अशी एक नदी आहे जिच्या पाण्याला लोक स्पर्शही करत नाहीत. या नदीचे नाव कर्मनासा आहे. कर्मनाश हा कर्म आणि नशा या दोन शब्दांनी बनलेला आहे. कर्मनासा नदीच्या पाण्याला स्पर्श केल्याने लोकांची कामे बिघडतात, अशी मान्यता आहे. एवढेच नाही तर सत्कर्माचीही माती होते असे स्थानिक लोकं सांगतात. त्यामुळे लोकं या नदीच्या पाण्याला हातही लावायला घाबरतात. तसेच ते पाणी कशासाठीच वापरले जात नाही.

अशी आहे पौराणिक कथा आहे

पौराणिक कथेनुसार, राजा हरिश्चंद्राचे वडील सत्यव्रत यांनी एकदा त्यांचे गुरू वशिष्ठ यांच्याकडे सशरीर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त केली. पण गुरूंनी त्यासाठी नकार दिला. राजा सत्यव्रत यांनी गुरु विश्वामित्र यांनासुद्धा हीच विनंती केली. वशिष्ठाशी असलेल्या वैरामुळे विश्वामित्राने सत्यव्रताला त्याच्या तपश्चर्येच्या बळावर सशरीर स्वर्गात पाठवले. हे पाहून इंद्रदेव क्रोधित झाले आणि त्यांनी राजाचे मस्तक पृथ्वीवर पाठवले.

हे सुद्धा वाचा

विश्वामित्रांनी आपल्या तपश्चर्येने राजाला स्वर्ग आणि पृथ्वीच्यामध्ये थांबवले आणि नंतर देवांशी युद्ध केले. या दरम्यान राजा सत्यव्रत आकाशात उलटे लटकले होते, त्यामुळे त्यांच्या तोंडातून लाळ पडू लागली. ही लाळ नदीच्या रूपात पृथ्वीवर आली. दुसरीकडे गुरू वशिष्ठांनी राजा सत्यव्रत याला त्याच्या दुष्टपणामुळे चांडाल होण्याचा शाप दिला. लाळेपासून नदी तयार झाल्यामुळे आणि राजाला मिळालेल्या शापामुळे ती शापित मानली गेली असे मानले जाते. याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)