मुंबई : वैदिक दिनदर्शिकेनुसार, यावर्षी कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2023) 6 आणि 7 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. हे दोन्ही दिवस अष्टमी तिथी आहेत. भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमी तिथीला आणि रोहिणी नक्षत्रात झाला. त्यामुळे 6 आणि 7 तारखेला जन्माष्टमी साजरी करता येईल. या वेळी 30 वर्षांनंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी हा शुभ मुहूर्त असणार आहे. यावर्षी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. 3 राशीच्या लोकांना या योगातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया या 3 राशी कोणत्या आहेत.
यंदाच्या जन्माष्टमीला मिथुन राशीच्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते. यावेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. याशिवाय पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. या काळात तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात यश मिळू शकते. विवाह इच्छुकांसाठी स्थळ येतील.
सर्वार्थ सिद्धी योग तूळ राशीच्या लोकांसाठी प्रत्येक क्षेत्रात शुभ आणू शकतो. या काळात उपजीविकेची साधने वाढू शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडूनही सहकार्य मिळू शकते. तुमचे प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकतो. श्रीकृष्णाच्या कृपेने अविवाहीतांना जोडीदार मिळेल.
मीन राशीसाठी जन्माष्टमी विशेष फायदेशीर ठरू शकते. या कालावधीत तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. तसेच, मेहनतीचे फळ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. या काळात नोकरदारांना बढती मिळू शकते. व्यावसायात केलेले बदल तुम्हाला लाभदायक ठरेल. जुन्या ओळखीतू फायदा होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)