13 जुलै 2022 रोजी सकाळी 11:01 वाजता शुक्र मिथुन राशीत प्रवेश करेल, जो 7 ऑगस्टपर्यंत राहील. दुसरीकडे, दुसरा शुभ ग्रह बुध आधीच मिथुन राशीत आहे. म्हणजेच मिथुन राशीमध्ये शुक्र आणि बुध या दोन शुभ ग्रहांचा संयोग आहे. बुध आणि शुक्र या ग्रहांच्या संयोगाने एक अतिशय शुभ योग लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. याला महालक्ष्मी योग (mahalaksmi yog) असेही म्हणतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) शुक्र हे संपत्ती आणि विलासाचे प्रतीक आहे. शुक्र सौंदर्य आणि विवेक देतो. जीवनात सुखसोयी आणि चैनीच्या गोष्टी मिळवण्याची संधी शुक्र देतो. विलासी आणि महागड्या वस्तूंचा कारक ग्रह म्हणून शुक्राला ओळखले जाते. हे प्रेम, प्रणय, लक्झरी, सौंदर्य, फॅशन डिझायनिंग, कला, वैवाहिक आनंद या गोष्टी शुक्राच्या अधिपत्याखाली येतात. ज्योतिषशास्त्रात महालक्ष्मी योग अत्यंत शुभ मानला जातो. ज्या लोकांच्या कुंडलीत या योगाचा प्रभाव असतो, त्यांना जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि वैभव सहज प्राप्त होते. बुध-शुक्र ग्रह आणि महालक्ष्मी योग यांच्या संयोगाने काही राशीच्या लोकांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)