मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.
तुमच्या सकारात्मक आणि सहकार्याच्या वागणुकीमुळे तुम्हाला कुटुंबात आणि समाजात विशेष मान सन्मान मिळेल. जमिनीशी संबंधित कोणतीही वादग्रस्त समस्या असल्यास अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यात यश नक्कीच मिळेल.
वैयक्तिक कामासोबतच सामाजिक उपक्रमांकडेही लक्ष देणं गरजेचे आहे. एखाद्याच्या बोलण्यात अडकून तुम्ही स्वतःच ही नुकसान करू शकता. कोणाच्या ही बोलण्यात येवू नका, हे लक्षात ठेवा. पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्या.
व्यवसायातील बदलाशी संबंधित योजनांवर काम सुरू होईल. यावेळी, मार्केटिंग आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आपला अधिक वेळ घालवा. नोकरदार लोकांनी रागात येऊन बॉस आणि अधिकाऱ्यांशी संबंध बिघडवू नयेत.
लव्ह फोकस- एखाद्याच्या लग्नाच्या नियोजनामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. प्रेमसंबंधांमध्येही जवळीकता येईल.
खबरदारी- कामाच्या जास्त ताणामुळे मानसिक व शारीरिक थकवा राहू शकतो. स्वतःसाठीही थोडा वेळ काढा.
शुभ रंग – हिरवा
भाग्यवान अक्षर – अ
अनुकूल क्रमांक – 5
आपल्या भूतकाळातील चुकांमधून शिका आणि वर्तमान काळ चांगला करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला योग्य यश मिळेल. जमिनीशी संबंधित कोणतीही खरेदी आणि विक्रीचे व्यवहार होऊ शकतात.
विद्यार्थी आणि तरुणांनी त्यांच्या ध्येयाची जाणीव ठेवली पाहिजे. नकारात्मक प्रवृत्ती असलेले मित्रही तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकतात. ज्येष्ठ अनुभवी लोकांचा सल्ला व मार्गदर्शन तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.जर तुम्ही व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ते काम सुरू करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा. नोकरदार लोकांवर काही अधिकार येऊ शकतात.
लव्ह फोकस- घरातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील. प्रेमप्रकरणात वेळ आणि पैसा वाया घालवू नका.
खबरदारी- हंगामी आजारांच्या समस्या कायम राहतील. पण थोडी काळजी घेतल्यास तुम्हीही निरोगी राहाल.
शुभ रंग – नारिंगी
भाग्यवान अक्षर – प
अनुकूल क्रमांक – 1
धार्मिक व सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. जनसंपर्काची व्याप्तीही वाढेल. तुम्ही स्वत:ला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत ठेवाल. परिस्थिती आणि काळ तुम्हाला खूप मदत करतोय. तुमची कामे पूर्ण करण्यासाठी तुमची पूर्ण क्षमता आणि मेहनत पणाला लावा.
राग आणि घाई यासारख्य गोष्टींवर नियंत्रण ठेवा. नातेवाईक तसंच शेजऱ्यांशीवादा सारखी परिस्थिती उद्भवु शकते. घरातील ज्येष्ठांचा अनुभव आणि मार्गदर्शन तुम्हाला कायमच मिळत आलं आहे. त्याचं म्हणणं मार्गदर्शन लक्ष पूर्वक ध्यानात घ्या.
प्रोडक्शन संबंधित कामात घट झाल्यामुळे व्यवसायात तणाव निर्माण होऊ शकतो. इंपोर्ट-एक्सपोर्ट संबंधित व्यवसायात सुधारणा होईल. सरकारी नोकरीत कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे कामात दुर्लक्ष करू नका. कारण तक्रार होण्याची परिस्थिती आहे.
लव्ह फोकस – घरातील वातावरण गोड राहील. कोणतेही शुभ कार्य पूर्ण होऊ शकते.
खबरदारी – संसर्गासारख्या समस्या असू शकतात. विशेषतः महिलांनी त्यांच्या आरोग्याबाबत जागरुक राहावे.
शुभ रंग – निळा
भाग्यवान अक्षर – स
अनुकूल क्रमांक – 6