हातावरील रेषा (palm reading) एखाद्या व्यक्तीचे भाग्य आणि व्यक्तिमत्त्व (Personality) याबद्दल बरेच काही सांगतात. माणूस किती श्रीमंत असेल? एखाद्या विशिष्ट क्षेत्रात किती नाव कमवाल? एखाद्याच्या आयुष्यात किती अडचणी असतील? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे हस्तरेखामध्ये दडलेली आहेत. हस्तरेषा शास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते तळहातावर ‘M’ ची रेषा (M sign on Plam) असते त्यांच्या आयुष्यात पैसा आणि प्रसिद्धीची कमतरता नसते. हे लोकं अत्यंत भाग्यवान असतात. यांना आयुष्यात सोन्यासारख्या संधी मिळतात आणि मुख्य म्हणजे ते या संधीचे सोने करतात.
तळहातावर ‘M’ रेषेचे महत्त्व
- जेव्हा हृदय, बुद्धी आणि जीवनरेषा यांच्या रेषा एकत्र होऊन तळहातावर ‘M’ तयार होतो तेव्हा हे भाग्याचे लक्षण मानले जाते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हस्तरेषाशास्त्रात या ‘M’चे विशेष महत्त्व सांगितले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, असे फार कमी लोक आहेत ज्यांच्या तळहातावर हा ‘M’ दिसतो आणि ज्या लोकांच्या तळहातावर हा ‘M’ असतो, ते खूप विशेष असतात.
- हस्तरेषा तज्ज्ञांच्या मते असे लोक खूप भाग्यवान असतात. असे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप उंची गाठतात. असे लोक प्रेरणादाई असतात. त्यांच्यातील हा गुण त्यांना इतरांपेक्षा वेगळा बनवतो.
- तळहातावर ‘M’ असणारे करिअरच्या सुरवातीलाच उत्तम यश मिळवतातच, शिवाय व्यक्तीला पारखण्याची उत्तम समजही असते. हे लोक फसवणूक, कपट किंवा हुशारी पकडण्यात खूप पटाईत असतात. समोर कोणी खोटं बोललं किंवा फसवलं तर हे लोक लगेच पकडतात.
- तथापि, हस्तरेखाशास्त्राचे हे तत्त्व डाव्या डावखुऱ्या लोकांवर अगदी उलट परिणाम करते. असे म्हटले जाते की, डावखुऱ्या लोकांच्या डाव्या हातावर हा ‘M’ असेल तर शुभ परिणाम मिळत नाहीत.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)