चंद्रग्रहणाचा राशीवर परिणाम
Image Credit source: Social Media
मुंबई, सर्वसाधारणपणे चंद्रग्रहणाच्या (lunar Eclipse 2022) वेळी चंद्रासोबत केतू आणि सूर्यासोबत राहू असतो, मात्र यंदा ग्रहणाच्या वेळी केतू सूर्यासोबत आणि राहू चंद्रासोबत विराजमान आहे, त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे फार चांगले मानले जात नाही. निःसंशयपणे, ग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे, परंतु त्याची वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्रीय बाजू देखील तितकीच महत्त्वाची मानली जाते. आपल्या चंद्र राशीवर ग्रहणाचा काय परिणाम होईल हे जाणून घेण्याची बहुतेकांना उत्सुकता असते. त्यांच्या कुंडलीत ग्रह, दशा, संक्रमण शुभ किंवा अशुभ असेल, तर ग्रहणाचे परिणाम त्यानुसार मिळतात. जाणून घेऊया हे ग्रहण बारा राशींसाठी कसे असणार आहे.
- मेष- ज्यांचा स्वामी मंगळ आहे, त्यांच्यासाठी चंद्रग्रहण अशुभ राहील, भीती निर्माण होईल.
- वृषभ- हे चंद्रग्रहण वृषभ राशीसाठी शुभ नाही. अचानक तुम्हाला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते आणि धनहानी होऊ शकते.
- मिथुन- शुभ परिणाम देईल. करिअर-व्यवसायात विशेष लाभ होईल.
- कर्क- शुभ परिणाम देणारे सिद्ध होईल आणि सुख-समृद्धी वाढेल.
- सिंह- कुटुंबात मतभेद निर्माण होऊ शकतो. असे काम करणे टाळावे, ज्यामुळे भविष्यात अपमानाला सामोरे जावे लागेल.
- कन्या- काहींना खूप त्रास सहन करावा लागू शकतो.
- तूळ- कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जोडीदारासोबत मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.
- वृश्चिक- हे चंद्रग्रहण सुख आणि सौभाग्य देईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
- धनु- चिंता वाढेल आणि भविष्यात नको असलेल्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
- मकर- कष्टाचे कारण बनेल. अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे टाळावे.
- कुंभ- ऐश्वर्य आणि सौभाग्य वाढवणारे सिद्ध होईल. धनलाभ होईल.
- मीन- अचानक नुकसान होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)