मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) ग्रहणाची घटना खूप खास आणि महत्वाची मानली जाते. या वर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबरला शरद पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. 30 वर्षांनंतर शरद पौर्णिमेच्या मुहूर्तावर ग्रहण होणार आहे. या वर्षातील हे शेवटचे ग्रहण (Lunar Eclipse) असेल, जे भारतात दिसणार आहे. या कारणास्तव त्याचा सुतक कालावधी देखील वैध असेल. जोतिषशास्त्रानुसार सर्वांच्या जीवनावर त्याचा परिणाम दिसून येईल. ज्योतिषशास्त्रानुसार 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून चंद्रग्रहण सुरू होईल आणि पहाटे 2.25 वाजता संपेल. शास्त्रानुसार अशा वेळी लोकांनी अनेक विशेष गोष्टींची काळजी घ्यावी. विशेषत: गरोदर महिलांनी ग्रहणकाळात काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. असे मानले जाते की ग्रहणाच्या वेळी नकारात्मक शक्ती प्रबळ होतात. अशा परिस्थितीत त्याचा प्रभाव विशेषतः गर्भवती महिलांवर दिसून येतो. गरोदर स्त्रीसाठी शास्त्रामध्ये काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. हे ग्रहण 30 वर्षांनंतर शरद पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. त्याचा सुतक कालावधी सुमारे 9 तास आधी सुरू होईल. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी काही खास नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार गरोदर महिलांनी चंद्रग्रहण पाहणे टाळावे. या काळात घराबाहेर पडणेही टाळावे.
ज्योतिष शास्त्रानुसार गरोदर महिलांनी घरातील अशा ठिकाणी थांबावे, जिथे ग्रहणाच्या किरणांचा प्रभाव पडू शकत नाही.
शास्त्रानुसार गरोदर महिलांनी चंद्रग्रहणाच्या दिवशी जास्तीत जास्त विष्णु सहस्त्रनाम पठण करावे. महिलांनी पूजेवर लक्ष केंद्रित करावे, परंतु या काळात महिलांनी मंदिरात जावू नये.
गर्भवती महिलांनी या कात अन्न ग्रहण करू नये. ग्रहणाच्या किरणांमुळे अन्न दुषीत होते. तसेच ग्रहण झाल्यानंतर मिठाच्या पाण्याने घर पुसावे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)