मुंबई : वैदिक शास्त्रांमध्ये चंद्राला मनाचा आणि भावनेचा कारक म्हटले आहे. असे म्हणतात की चंद्राच्या अनुकूलतेमुळे व्यक्तीचा स्वभाव शांत आणि सर्जनशील बनतो. काही कारणाने प्रतिकूल झाले तर माणसाचे जीवन विस्कळीत व्हायला वेळ लागत नाही. चंद्र आपल्यासाठी अनुकूल किंवा प्रतिकूल असेल, हे चंद्रग्रहणाच्या स्थितीवर देखील बरेच अवलंबून असते. या वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) शुक्रवार, 5 मे 2023 ला होणार आहे. हे ग्रहण दुपारी 1.34 वाजता होणार असून त्याचा थेट परिणाम 5 राशींवर होणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशी यामुळे प्रभावित होणार आहे.
या राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मानसिकदृष्ट्याही तणावात राहाल. कुटुंबात कलह होऊ शकतो. भगवान शंकराची पूजा करून स्वतःला सृजनात्मक कार्यात व्यस्त ठेवल्यास चांगले होईल.
भावंडांशी मतभेद होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीबाबत मतभेद वाढू शकतात. इच्छा नसतानाही बाह्य चिंता तुम्हाला घेरतील. या दरम्यान शांती मिळविण्यासाठी आपल्या कुटुंबासमवेत अधिक वेळ घालवा. मानसिक शांतीसाठी तुम्ही मंदिरातही जाऊ शकता.
नोकरीत लक्ष्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचे आयुष्य खर्च कराल, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या व्यस्ततेमुळे नातेवाईकांशी तुमचे अंतर वाढू शकते.
घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. तुमचे दिलेले पैसे बुडू शकतात. कायदेशीर वादातही अडकण्याची शक्यता आहे. जीवनात हुशारीने निर्णय घ्या. मानसिक शांततेसाठी उपाय करा.
या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण अशुभ माहिती घेऊन येईल. कुटुंबासोबत काही अनुचित प्रकार घडण्याचा धोका आहे. मन विचलीत राहिल. आरोग्यावर वाईट परिणाम होतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)