मुंबई : भोलेनाथाचे भक्त महाशिवरात्रीची (Mahashivratri 2024) आतुरतेने वाट पाहत असतात. हा पवित्र असा दिवस आहे जेव्हा शिव आणि शक्ती युगानुयुगे एक झाले. महाशिवरात्री हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार, महाशिवरात्री हा पवित्र सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. महाशिवरात्रीचा हा उत्सव 8 मार्च रोजी साजरा होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया शिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा करण्यासाठी कोणता शुभ मुहूर्त असेल.
हिंदू धर्मात महाशिवरात्रीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भोलेनाथ माता पार्वतीसोबत पृथ्वीवर येतात. या दिवशी भगवान शिव आणि गौरी यांची विधिपूर्वक आणि खऱ्या मनाने पूजा केल्याने अनेक पटींनी अधिक शुभ फल प्राप्त होतात. या दिवशी काशी, उज्जैन, हरिद्वारसह इतर शिव तीर्थक्षेत्रांवर महाशिवरात्री पूजेची विशेष शोभा असते. प्रत्येक शहरात मोठ्या थाटामाटात शिवाची मिरवणूक काढली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)