महाशिवरात्रीला शनि पीडेतून सुटका मिळवण्यासाठी करा उपाय, जाणून घ्या ग्रहांची स्थिती
मुंबई : महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक सण आहे. महाशिवरात्रीचा उत्सव दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो. या वर्षी महाशिवरात्री 18 फेब्रुवारीला असून योगायोगाने शनिवार आला आहे. त्यामुळे शनि पीडा असणाऱ्या जातकांना या तिथीचा फायदा घेता येईल. पौराणिक कथेनुसार, शनिदेव हे भगवान शंकराचे परम भक्त आहे. यामुळे या दिवशी काही उपाय केल्यास शनि साडेसाती, अडीचकी, शनि महादशा-अंतर्दशा यातून दिलासा मिळू शकतो. सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरु आहे. तर कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरु आहे. या राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्यास दिलासा मिळू शकतो.
महाशिवरात्रीला ग्रहांची स्थिती
महाशिवरात्रीला शनिदेव आपली स्व-रास असलेल्या कुंभ राशीत विराजमान असणार आहेत. दुसरीकडे सूर्यदेव गोचर करुन कुंभ राशीत आल्याने शनि-सूर्य युति तयार झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ही युती अशुभ मानली जाते. दुसरीकडे शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचं गोचर काही राशींसाठी शुभ ठरू शकते. शनिचा प्रभाव कमी करण्यासाठी शिवलिंगावर पुढील बाबी अर्पण करा.
- गंगाजल- महाशिवरात्रीला शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने शनि साडेसाती आणि अडीचकीचा प्रभावकमी होऊ शकतो. यासाठी तांब्यात पाणी घेऊन त्यात गंगाजल टाका आणि अभिषेक करा.
- दूध- भगवान शंकर आणि गळ्यात असलेल्या वासुकी नागाला दूध प्रिय आहे.त्यामुळे शिवलिंगावर दूध अर्पण केल्याचा फायदा होईल. तसेच शनि साडेसाती आणि अडीचकीतून सुटका होईल.
- दही- शनि पीडा खुपच त्रासदायक असेल तर महाशिवरात्रीला शिवलिंगावर दही अर्पण करा. यामुळे तुमचा साडेसाती आणि अडीचकीचा त्रास कमी होईल.
- देशी तूप- शिवलिंगावर देशी तूप अर्पण केल्याने शनि त्रासातून दिलासा मिळतो. कारण शनिच्या क्रोधित नजरेतून वाचण्यासाठी हा उपाय आहे.
- मध- शनिच्या कोपातून दिलासा मिळवण्यासाठी तुम्ही शिवलिंगावर मध अर्पण करू शकता. यामुळे अडीचकी, महादशेत दिलासा मिळेल.
- भांग- भगवान शंकरांना भांग प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी भांग अर्पण केल्यास इच्छित फळ मिळतं. तसेच शनि पीडेतून दिलासाही मिळतो.
महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त
- निशित काळ – 18 फेब्रुवारी, रात्री 11 वाजून 52 मिनट ते 12 बजकर 42 मिनिटांपर्यंत
- पहिला प्रहर – 18 फेब्रुवारी, संध्याकाळी 06 वाजून 40 मिनिटं ते रात्री 09 वाजून 46 मिनिटांपर्यंत
- द्वितीय प्रहर – रात्री 09 वाजून 46 मिनिटांपासून रात्री 12 वाजून 52 मिनिटांपर्यंत
- तृतीय प्रहर – 19 फेब्रुवारी, रात्री 12 वाजून 52 मिनिटांपासून 03 वाजून 59 मिनिटांपर्यंत
- चौथा प्रहर -19 फेब्रुवारी, 03 वाजून 59 मिनिटांपासून सकाळी 07 वाजून 05 मिनिटांपर्यंत
- पारण वेळ – 19 फेब्रुवारी 2023, सकाळी 06 वाजून 10 मिनिटांपासून दुपारी 02 वाजून 40 मिनिटांपर्यंत
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)