मुंबई : महाशिवरात्रीचं पर्व अवघ्या काही तासांनी सुरु होणार आहे.हिंदू धर्मशास्त्रात या दिवसाचं महत्त्व खूप आहे. महाशिवरात्री 18 फेब्रुवारी 2023 रोजी शनिवारी येत आहे. भगवान शिवाची निशित काळात पूजा केल्यास लवकर प्रचिती येते.निशित काळ 18 फेब्रुवारी, रात्री 11 वाजून 52 मिनट ते 12 बजकर 42 मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशी भगवान शिवांची मनोभावे पूजा केल्यास लवकर फळ मिळतं अशी मान्यता आहे.पुराणानुसार बारा ज्योतिर्लिंगाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं आहे. या ठिकाणी भोलेनाथांनी प्रकट होत भक्तांना दर्शन दिलं होतं. त्यामुळे या ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने दाखल होतात. महाशिवरात्रीला तर या ठिकाणी भक्तांची रिघ लागते. शास्त्रात 12 ज्योतिर्लिंगांची नावं एका श्लोकात सांगितली गेली आहेत.त्यापैकी ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत.
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। :उज्जयिन्यां महाकालमोंकारममलेश्वरम्॥1॥
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्।:सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने॥2॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे।:हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये॥3॥
एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रात: पठेन्नर:।:सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥4॥
सोमनाथ : गुजरातमधील प्रभास क्षेत्रात हे मंदिर आहे. शिवपुराणानुसार प्रजापती दक्षाने चंद्राला क्षयरोगाचा शाप दिला होता, तेव्हा या ठिकाणी भगवान शंकराची पूजा करून तपश्चर्या केल्याने चंद्राची शापातून मुक्तता झाली.
मल्लिकार्जुन :हे मंदिर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावरील श्रीशैल पर्वतावर आहे. या पर्वताला दक्षिणेतील कैलास असंही संबोधलं जातं.
महाकालेश्वर :ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातालील उज्जैनच्या क्षिप्रा नदीच्या तटावर स्थित आहे.
ओंकारेश्वर : हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील नर्मदा नदी पात्रात आहे. या ठिकाणी ओंकारेश्वर आणि अमलेश्वर असे दोन लिंग आहेत. पण एकच लिंगाची दोन स्वरुपात पूजा केली जाते.
केदारनाथ : हे ज्योतिर्लिंग उत्तराखंडच्या हिमालयातील केदार नावाच्या पर्वतावर आहे.
भीमाशंकर : हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील भीमा नदीच्या तीरावर असलेल्या सह्याद्री पर्वतात आहे. शिवपुराणातील एका कथेनुसारी भीमाशंकर ज्योतिर्लिंग आसामच्या कामरुप जिल्ह्यातील गुवाहाटीजवळील ब्रह्मपूर पर्वतात असल्याचं देखील सांगितलं जातं.
काशी विश्वनाथ : उत्तर भारतातील या शिवलिंगाला सर्वाधिक पूज्यनीय मानलं जातं. हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशातील वारणासीमधील काशीत विराजमान आहे.
त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरीतील गोदावरी नदीकिनारी आहे. या स्थानाला पवित्र नदी गोदावरीचं उगम स्थानही मानलं जातं.
वैद्यनाथ : स्वंयभू ज्योतिर्लिंग झारखंडमधील देवघर येथील परळी गावाजवळ आहे. या ठिकाणी भगवान शिव वैद्यनाथाच्या रुपात प्रकट झाले होते.
नागेश्वर : ज्योतिर्लिंग गुजरातच्या द्वारकेत आहे. काही लोकांच्या मते हैदराबादमधील औंझा गावातील शिवलिंग हे नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून मानलं जातं.
रामेश्वर : ज्योतिर्लिंग तामिळनाडुतील रामनाड जिल्ह्यात स्थित आहे. रामायण आणि अन्य पौराणिक कथेनुसार भगवान रामांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी शिवाची पूजा केली होती. त्यामुळे या शिवलिंगाचं नाव रामेश्वर असं पडलं आहे.
घृष्णेश्वर : ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एलोरा गुंफेजवळ आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला घुसृणेश्वर असं संबोधलं जातं.
शिवलिंगावर बेलपत्र कायम उलट करून अर्पण करावं. म्हणजेच पानाची पुढची बाजू शिवलिंगाला स्पर्श झाली पाहीजे. तसेच बेलपत्र अर्पण करताना अनामिका,अंगठा आणि मधलं बोटांचा वापर एकत्रित करावा.