मुंबई, ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) ग्रहांचे संक्रमण खूप महत्वाचे मानले जाते आणि त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. संक्रमणाचा प्रभाव काही राशींवर चांगला तर काहींवर वाईट असतो. 13 जानेवारी 2023 रोजी मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti 2023) आधी, वृषभ राशीमध्ये मंगळ संक्रमण होत आहे. ज्यामुळे सर्व राशींवर परिणाम होईल. मंगल गोचरचा प्रभाव काही राशींवर चांगला राहील आणि त्यांच्यावर लक्ष्मी देवीचा आशीर्वाद असेल. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच आर्थीक अडचणींपासून सुटका होण्याची शक्यता आहे.
मेष राशीच्या लोकांना मंगल गोचरचा खूप फायदा होईल आणि कामात उत्साह येईल, पण यासोबतच मेष राशीच्या लोकांना संवादात संतुलन राखावे लागेल. मेष राशीच्या लोकांना धनसंपत्ती मिळते आणि ते कुटुंबासह कोणत्याही धार्मिक स्थळी जाऊ शकतात. मेष राशीच्या लोकांना मित्र भेटू शकतात. याशिवाय नोकरीत बदलीची शक्यताही निर्माण होत आहे.
मंगळ संक्रमणाचा प्रभाव मिथुन राशीवरही चांगला राहील आणि कुटुंबात शुभ कार्य होतील. मिथुन राशीच्या लोकांच्या व्यवसाय विस्ताराच्या योजना साकार होतील, नोकरीशी संबंधित लोकांना बदलीसोबत नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांना कपड्यांव्यतिरिक्त काही मौल्यवान वस्तू भेट म्हणून मिळू शकतात. याशिवाय आयात-निर्यात व्यवसायाशी संबंधित लोकांना लाभाची संधी मिळेल, तर नोकरदारांना अधिकार्यांचे सहकार्य मिळेल. यासोबतच मिथुन राशीच्या लोकांना आईचा सहवास मिळेल आणि वाहनाच्या सुखात वाढ होईल.
कर्क राशीच्या लोकांना मंगळाच्या संक्रमणातून लाभात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, नोकरदारांना अधिका-यांचे सहकार्य मिळेल आणि त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकेल. यासोबतच कर्क राशीच्या लोकांचा आत्मविश्वास भरभरून राहील आणि कुटुंबाच्या सुख-सुविधांमध्ये विस्तार होईल.
मंगळ संक्रमणामुळे तूळ राशीच्या लोकांसाठी नोकरीत बदल होण्याची शक्यता निर्माण होत आहे. यासाठी त्यांना इतर ठिकाणी जावे लागेल, परंतु त्यांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल. तूळ राशीच्या लोकांना धार्मिक कार्यात सहभागी होण्याची आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. यासोबतच तुम्हाला वैवाहिक जीवनाचा आनंदही मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)