मुंबई, हिंदू धर्मातील ऊर्जा, उत्साह आणि समृद्धीचा सण मकर संक्रांती (Makar Sankranti 2023) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशीपासून उत्तरायण सुरू होते. या कारणास्तव मकर संक्रांतीचा सण उत्तरायण सण म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हणूनच याला मकर संक्रांत म्हणतात. यंदा 15 जानेवारी 2023 रोजी म्हणजे आज मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. मकर संक्रांतीचा दिवस दानधर्माच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून, प्रार्थना पाठ करून दानधर्म केल्यास पुण्य प्राप्त होते. जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान करणे शुभ आहे.
1. मकर संक्रांतीच्या सणाला तुम्ही तांदूळ आणि काळी उडीद खिचडी दान करू शकता. अशा दानांवर शनिदेव प्रसन्न होतात.
2. मकर संक्रांतीच्या सणावर काळ्या तिळापासून बनवलेल्या वस्तू दान केल्याने भगवान सूर्यदेव, भगवान विष्णूजी आणि शनिदेव प्रसन्न होतात. ज्योतिष शास्त्रानुसार काळे तीळ दान केल्याने तुमचे अशुभ दूर होते.
3. मकर संक्रांतीला गुळाचे दान केल्याने गुरु देव, शुक्र देव आणि शनिदेव हे तिन्ही ग्रह प्रसन्न होतात.
4. मकर संक्रांतीच्या सणाला मिठाचे दान केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
5. मकर संक्रांतीच्या सणावर शनि आणि राहूचे दोष दूर करण्यासाठी लोकरीचे कपडे दान करावेत.
6. मकर संक्रांतीच्या शुभेच्छेसाठी देशी तुपापासून बनवलेल्या पदार्थांचे दान करावे.
7. मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेवाच्या मंदिरात तेल अर्पण करणे खूप शुभ असते. यामुळे सुख समृद्धी मिळते.
8. मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या वस्तूंचे दान केल्याने सर्व प्रकारचे शनि दोष आणि राहू दोष दूर होतात.
9. मकर संक्रांतीच्या दिवशी गरिबांना रेवडी आणि शेंगदाणे खाऊ घातल्याने सौभाग्य प्राप्त होते.
10. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केल्यानंतर एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान केल्याने किंवा धनदान केल्याने घरात सुख-शांती राहते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)