मंगळ दोष उपाय
Image Credit source: Social Media
मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) मंगळ हा शनि, राहू आणि केतू प्रमाणेच क्रूर ग्रह मानला जातो. मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हणतात. मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा शासक ग्रह आहे. पत्रिकेत मंगल दोष (Mangal Dosh Upay) असल्यास त्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होतात असे म्हटले जाते. यामुळे व्यक्ती कर्जाच्या ओझ्याखाली दबतो. याशिवाय मालमत्तेशी संबंधित वादांनाही सामोरे जावे लागेल. पत्रिकेत मंगळ दोषाची लक्षणे आणि उपाय जाणून घेऊया.
पत्रिकेत मंगळ दोषाची लक्षणे
- ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगल दोष असेल तर त्या व्यक्तीच्या लग्नास विलंब होतो, यासोबतच अनेक प्रकारच्या अडचणी येतात.
- जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल तर त्याला जास्त राग येतो. त्यामुळे लोकं दुरावतात.
- जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल तर त्याला डोळ्यांशी संबंधित आजार होऊ शकतात. याशिवाय उच्च रक्तदाब , लिव्हर आणि किडनीशी संबंधित आजारही होऊ शकतात.
ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ दोष असेल तर अशा व्यक्तीला कादेशीर कारवाईला समोर जावे लागते.
जाणून घ्या मंगळ दोष कमी करण्याचे उपाय
- ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेत मंगळाची स्थिती अशुभ असेल तर त्या व्यक्तीने दररोज शिवलिंगाला जल अर्पण करावे. यासोबत पांढऱ्या रंगाचे फूल अर्पण करावे.
- ज्योतिष शास्त्रानुसार जर पत्रिकेत मंगळाची स्थिती खराब असेल तर त्या व्यक्तीने प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी विधीवत हनुमानजीची पूजा करावी.
- पत्रिकेत मंगळाची स्थिती अशुभ असेल तर त्या व्यक्तीने मसूर, गहू, लाल रंगाचे कपडे, गूळ इत्यादी दान करावे.
- जर पत्रिकेत मंगळ दोष असेल आणि विवाहात अडथळा येत असेल तर हनुमानजींची विधि-विधानानुसार पूजा करावी आणि त्यांना शेंदूर अर्पण करावा. त्यामुळे विवाहाची शक्यता निर्माण होऊ शकते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)