Neechbhang Rajyog: मंगळ ग्रहाचा गोचरासोबत नीचभंग राजयोगाची स्थिती, तीन राशींचे खुलणार आर्थिक मार्ग

| Updated on: Jun 12, 2023 | 8:58 PM

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठरावीक कालावधीनंतर गोचर करत असतो. यामुळे शुभ अशुभ ग्रहांची स्थिती निर्माण होते. मंगळाच्या गोचरामुळे नीचभंग राजयोग तयार होणार आहे. यामुळे तीन राशींना नशिबाची साथ मिळणार आहे.

Neechbhang Rajyog: मंगळ ग्रहाचा गोचरासोबत नीचभंग राजयोगाची स्थिती,  तीन राशींचे खुलणार आर्थिक मार्ग
Neechbhang Rajyog: मंगळ ग्रहाचं गोचर आणि नीचभंग राजयोगामुळे खुलणार तीन राशींचं नशीब, वाचा
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एक गोचर कालावधी असतो. त्यामुळे कमी अधिक कालावधीमुळे कधी कधी एकाच राशीच एकापेक्षा जास्त ग्रह येतात. त्यामुळे शुभ अशुभ योग तयार होतात. त्यामुळे काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ स्थिती भोगावी लागते. आता ग्रहांमध्ये सेनापतीचा दर्जा असलेला मंगळ ग्रह 10 मे रोजी गोचर करून कर्क राशीत स्थित आहे. कर्क मंगळाची नीच राशी आहे. त्यामुळे नीचभंग राजयोग तयार झाला आहे. मंगळ या स्थितीत 1 जुलै 2023 पर्यंत असणार आहे. यामुळे तीन राशीच्या जातकांना फायदा होणार आहे. या राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती याा काळात सुधारणार आहे. तसचे समाजात मानसन्मान मिळण्याची दाट शक्यता आहे.

नीचभंग राजयोगामुळे तीन राशींना मिळणार नशिबाची साथ

मेष : मंगळ गोचरामुळे मेष राशीला नीचभंग राजयोग स्थितीमुळे जबरदस्त फायदा होणार आहे. अचानक झालेल्या धनलाभामुळे दिलासा मिळेल. बचत करण्यात तुम्हाला यश मिळेल. त्यामुळे आर्थिक गणित सुटताना दिसेल. या काळात गाडी किंवा घर खरेदी करू शकता. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामंही या काळात पूर्ण होतील. प्रॉपर्टी, रियल इस्टेटमधील कामं फलदायी ठरतील.

मिथुन : या राशीच्या जातकांना नीचभंग राजयोग लाभदायी ठरेल. नोकरीत नव्या संधी मिळू शकतात. कमाईच्या काही नवीन संधी मिळतील. उद्योग व्यवसायात अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळतील. नुसत्या चांगल्या बोलण्याच्या जोरावर काही कामं पूर्ण होतील. मीडिया, मार्केटिंग, कला आणि व्यापाऱ्याशीन निगडीत लोकांना फायदा होईल.

कन्या : कन्या राशीच्या जातकांना मंगळाचं राशी परिवर्तन फलदायी ठरणार आहे. नीचभंग राजयोगामुळे समाजात मान सन्मान वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. उद्योगपतींना लाभ मिळू शकतो. या काळात आर्थिक घडी नीट बसल्याने हातात पैसा खेळता राहील. भविष्याच्या दृष्टीकोनातून आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)