मुंबई : 18 ऑगस्ट 2023 रोजी मंगळ (Mangal Gochar) कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा ऊर्जा, जमीन, शक्ती, धैर्य, भाऊ, शौर्य इत्यादींचा कारक मानला जातो. अशा स्थितीत ज्यांच्या पत्रिकेत मंगळ उच्च स्थानात आहे, त्यांना या सर्व क्षेत्रांत लाभ होतो. तर दुसरीकडे ज्या राशींवर मंगळाची अशुभ दृष्टी असते, त्यांना या काळात विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मंगळ संक्रमणाचा सर्व राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडणार आहेत. मात्र काही राशी आहेत, ज्यांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
मेष राशीच्या लोकांना मंगळ संक्रमणाचे फायदे होतील. या दरम्यान, त्यांना कार्य क्षेत्रात नवीन जबाबदारी मिळू शकते, जी भविष्यात लाभदायक ठरेल. यासोबतच व्यापार क्षेत्रातही लाभाच्या संधी उपलब्ध होतील. कुटुंबातही आनंददायी वातावरण राहील. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत मतभेद कमी होतील. या काळात आरोग्यही सामान्य राहील आणि जातकाला आर्थिक क्षेत्रातही लाभ मिळेल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळ संक्रमण फलदायी ठरेल. या दरम्यान त्यांना कार्यक्षेत्र आणि व्यवसाय क्षेत्रात यशाच्या नवीन संधी मिळतील. यासोबतच मित्र आणि कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा असेल. ज्यांना नवीन काम सुरू करायचे आहे त्यांच्यासाठीही हा काळ चांगला मानला जातो. या दरम्यान वैवाहिक जीवनात गोडवा येईल आणि उर्जेमध्ये सकारात्मक वाढ होईल, ज्याचा परिणाम कामाच्या ठिकाणीही होईल.
कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण अनुकूल मानले जाते. व्यापार क्षेत्रात त्यांना फायदा होईल. यासोबतच एकाग्रता वाढेल, त्याचा परिणाम कामाच्या ठिकाणीही दिसून येईल. या काळात कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा असेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मुलांकडूनही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. हा काळ आरोग्यासाठीही उत्तम असेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)