Mars Transit : 18 ऑगस्टपर्यंत या राशीच्या लोकांसाठी सोन्यासारखे दिवस, आर्थिक आवक वाढेल

| Updated on: Jul 28, 2023 | 8:39 AM

जोतिषशास्त्रात ग्रहांच्या संक्रमणाला विशेष महत्त्व आहे. याचा परिणाम सर्वच राशीच्या जातकांवर होतो. मंगळाचे कन्या राशीत संक्रमण होत आहे. यामुळे का

Mars Transit : 18 ऑगस्टपर्यंत या राशीच्या लोकांसाठी सोन्यासारखे दिवस, आर्थिक आवक वाढेल
मंगळ युती
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : मंगळाला शासक ग्रह म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळाचे संक्रमण (Mars Transit) होण्यासाठी 45 दिवस लागतात. 18 ऑगस्टपर्यंत मंगळ सिंह राशीत बसला आहे. यानंतर कन्या राशीत प्रवेश होईल. या दरम्यान काही राशींवर सकारात्मक परिणाम जाणवतील. या राशीच्या लोकांच्या सुख सोयीमध्ये वाढ होईल. आर्थिक आवक वाढण्याचे चिन्ह आहे.  जाणून घेऊया मंगळाचे संक्रमण कोणत्या राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी असणार आहे.

या राशीच्या लोकांना होणार लाभ

मेष

मंगळाच्या संक्रमणाने मेष राशीच्या लोकांसाठी शुभ दिवस सुरू झाला आहे. करिअर आणि व्यवसायात लाभ होईल. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. बचत करण्यात यश मिळेल. या काळात तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवू शकाल. वडिलोपार्जीत मालमत्तेचे प्रकरण मार्गी लागेल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळाची यात्रा भाग्यवान ठरेल. या काळात आर्थिक सुधारणा होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. शौर्य उदयास येईल. मालमत्तेशी संबंधित वाद शांततेने सोडवण्यात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी वेळ लाभदायक आहे. विरोधकांचे मनसुबे धुळीत मिळतील.

हे सुद्धा वाचा

सिंह

18 ऑगस्टपर्यंत सिंह राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सर्व कामे यशस्वी होतील. मालमत्ता आणि वाहनाशी संबंधित लाभ मिळतील. एवढेच नाही तर साहस आणि शौर्यही वाढेल. यावेळी तुम्ही महत्त्वाची खरेदी करू शकता. नवीन नोकरीच्या ऑफर मिळतील. कट कारस्थान करणाऱ्याचे पितळ उघडं पडेल.

धनु

या राशीच्या लोकांची धार्मिक कार्यात रुची वाढेल. व्यवसाय आणि नोकरी या दोन्ही क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांना अनुकूल परिणाम मिळतील. आर्थिक बाजूनेही बळ मिळेल. वारसाहक्काने मिळालेल्या या काळात संपत्तीचा फायदा होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)