वृषभमधून मिथुन राशीत चंद्राचं गोचर, पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी कसे असतील ? जाणून घ्या

| Updated on: Feb 28, 2023 | 2:36 PM

राशी मंडळातील चंद्राचं इतर ग्रहांच्या तुलनेत वेगाने भ्रमण होतं. त्यामुळे चंद्र एका राशीत आल्यानंतर त्या राशीतील ग्रहासोबत युती आघाडी करतो. शुभ ग्रहासोबत शुभ फळं, तर पाप ग्रहासोबत तसंच फळ देतो.

वृषभमधून मिथुन राशीत चंद्राचं गोचर, पुढचे दोन दिवस तुमच्यासाठी कसे असतील ? जाणून घ्या
Chandra Gochar : मिथुन राशीतील गोचरामुळे पुढचे दोन दिवस तुमची मन:स्थिती कशी असेल ? जाणून घ्या
Follow us on

मुंबई : ग्रहमंडळात सर्वात वेगाने भ्रमण करणारा ग्रह म्हणजे चंद्र..त्यात गोचर करताना शुल्क पक्षात चंद्राची चांगली फळं, तर कृष्ण पक्षात अपेक्षित फळं मिळत नाहीत. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. अनेकदा आपल्याला नकळत भिती वाटते. त्याचबरोबर एखाद्या दिवस उत्साहात जातो आणि कामं पटापटा होतात. चंद्राचं एका राशीतील स्थान काही तासांसाठी असल्याने मानसिक चलबिचल दिसून येते.चंद्र महिन्याला 13 ते 14 वेळा राशी बदल करतो. त्यामुळे ग्रहांसोबत युती आघाडी काही नवीन नाही. शुक्ल पक्षात शुभ ग्रहासोबत आल्यास चांगली फळ मिळतात. पण तोच चंद्र कृष्ण पक्षात क्षीण होत असताना एखाद्या पापग्रहासोबत आला तर काही तास नकोसे होतात.

आता मार्च महिना सुरु होणार असून चंद्र वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र ग्रह मिथुन राशीत सव्वा दोन दिवस असणार आहे. 3 मार्च रोजी (शुक्रवार) चंद्र ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत सकाळी 8:58 मिनिटांनी प्रवेश करेल.

फाल्गुन शुक्ल पक्ष सुरु असून चंद्र कलेकलेने वाढत आहे. त्यात मिथुन राशीची अडीचकी संपली आहे. त्यामुळे निश्चित चंद्राचं पाठबळ मिथुन राशीला मिळणार आहे. चंद्राने पहिल्या, तिसऱ्या, सहाव्या, दहाव्या आणि अकराव्या स्थानात प्रवेश केल्यास चांगली फळ देतो. बाकी स्थानात चंद्र संमिश्र परिणाम देतो. या काळात काही अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो.

चंद्र गोचर 1 मार्च ते 3 मार्च 2023 (शुक्ल पक्ष)

  • मिथुन- पहिलं स्थान (सकारात्मक)
  • कर्क – बारावं स्थान (संमिश्र परिणाम)
  • सिंह – अकरावं स्थान (सकारात्मक)
  • कन्या – दहावं स्थान (सकारात्मक)
  • तूळ – नववं स्थान (संमिश्र परिणाम)
  • वृश्चिक – आठवं स्थान (संमिश्र परिणाम)
  • धनु – सातवं स्थान (संमिश्र परिणाम)
  • मकर – सहावं स्थान (सकारात्मक)
  • कुंभ – पाचवं स्थान (संमिश्र परिणाम)
  • मीन – चौथं स्थान (संमिश्र परिणाम)
  • मेष – तिसरं स्थान (सकारात्मक)
  • वृषभ- दुसरं स्थान (संमिश्र परिणाम)

उपाय

  • चंद्र गोचराच्या चांगल्या परिणामासाठी संध्याकाळी चंद्राच्या बीज मंत्राचा जप करावा.असं गोचर कालावधीन कायम करा.|| ॐ सों सोमाय नम: || किंवा ॥ ॐ श्रां श्रीं श्रौं स: चन्द्रमसे नम: ॥ मंत्राचा जप करा.
  • चंद्राची स्थिती खुपच कमकुवत असल्यास बीज मंत्राचा जप शुक्ल पक्षातील सोमवारी करावा. बीज मंत्राचा जप 1000 वेळा करा. म्हणजेच दहा माळ जपा.
  • चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी गरजूंना दुधाचं वाटप करा. चंद्राची स्थिती चांगली ठेवण्यासाठी सोमवारी उपवास करा. किती सोमवार उपवास करायचा हे निश्चित करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)