Nag Panchami 2022: नागपंचमीला राशीनुसार ‘या’ मंत्रांचा करा जप, सर्व दोष होतील दूर 

| Updated on: Jul 31, 2022 | 4:33 PM

हिंदू धर्मात सापाला भगवान शंकराच्या गळ्यातील अलंकार मानले जाते. त्यामुळे या दिवशी नागांची देवता महादेवाची पूजा करणे शुभ मानले जाते.

Nag Panchami 2022: नागपंचमीला राशीनुसार या मंत्रांचा करा जप, सर्व दोष होतील दूर 
नागपंचमी
Follow us on

हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या नागपंचमीचा (Nag panchami) सण मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 रोजी येत आहे. या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मात सापाला भगवान शंकराच्या गळ्यातील अलंकार मानले जाते. त्यामुळे या दिवशी नागांची देवता महादेवाची पूजा करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीच्या सणावर शिवलिंगावर अभिषेक, शिव सहस्रनाम स्रोताचे पठण आणि महामृत्युंजय मंत्राचा (Mahamrutyunjay mantra) जपसुद्धा करण्यात येतो. या दिवशी सर्पदेवतेची मनोभावे  व शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा केल्यास आध्यात्मिक शक्ती वाढते आणि आर्थिक संकटे दूर होतात, असे मानले जाते. तसेच ज्योतिषशास्त्राच्या तज्ज्ञांच्या मते कुंडलीतील कालसर्प दोष आणि राहू-केतू ग्रह दोष दूर होण्यासोबतच कुंडलीतील सर्व ग्रह शांत होतात. चला तर मग जाणून घेऊया राशीनुसार नागपंचमीची पूजा केल्यानंतर कोणते मंत्र लाभदायक असतात.

नाग पंचमी पर राशि अनुसार करें इन मंत्रों का जाप

  1. मेष राशि- ॐ वासुकेय नमः
  2. वृष राशि- ॐ शुलिने नमः
  3. मिथुन राशि- ॐ सर्पाय नमः
  4. कर्क राशि- ॐ अनन्ताय नमः
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह राशि- ॐ कर्कोटकाय नमः
  7. कन्या राशि- ॐ कम्बलाय नमः
  8. तुला राशि- ॐ शंखपालय नमः
  9. वृश्चिक राशि- ॐ तक्षकाय नमः
  10. धनु राशि- ॐ पृथ्वीधराय नमः
  11. मकर राशि- ॐ नागाय नमः
  12. कुंभ राशि- ॐ कुलीशाय नमः
  13. मीन राशि- ॐ अश्वतराय नमः

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)