मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) सूर्य हा पित्याचा कारक मानला जातो. पत्रिकेत सूर्य बलवान असेल तर व्यक्तीला करिअर आणि व्यवसायात खूप प्रगती प्राप्त होते. त्याचबरोबर पत्रिकेत सूर्य कमजोर असेल तर जीवनात यश मिळवण्यात अडथळे येतात. पत्रिकेत सूर्य बलवान राहणे फार महत्वाचे आहे. सूर्य दर 30 दिवसांनी आपली राशी बदलतात. सध्या सूर्य कन्या राशीत आहे. नवरात्रीच्या काळात 18 ऑक्टोबरला सूर्य कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करेल. या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण काही राशी आहेत ज्यांचा या काळात सर्वाधिक फायदा होईल. 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 01:29 वाजता सूर्य देव कन्या राशीतून बाहेर पडून तूळ राशीत प्रवेश करेल. या काळात 24 ऑक्टोबरला स्वाती नक्षत्र आणि 7 नोव्हेंबरला विशाखा नक्षत्र असेल. यानंतर 17 नोव्हेंबरला सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
धनु राशीच्या उत्पन्नाच्या घरात सूर्याचे भ्रमण होईल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. संपत्तीचे नवीन मार्ग उघडू शकतात. धैर्य आणि शौर्य वाढेल. परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मकर राशीच्या करिअर घरामध्ये सूर्याचे संक्रमण होणार आहे. अशा परिस्थितीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. नवीन घर किंवा नवीन वाहन खरेदी करू शकता. या काळात व्यावसायिकांना मोठी ऑर्डर मिळू शकते. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात.
कुंभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण फायदेशीर ठरेल, कारण या राशीच्या लोकांच्या भाग्यस्थानात सूर्याचे भ्रमण होणार आहे. या राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचा काळ खूप शुभ असणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. आर्थिक लाभ होईल. तुमचे तुमच्या जोडीदाराशी सौहार्दपूर्ण संबंध असतील. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.
कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण शुभ परिणाम देणारे आहे. कन्या राशीच्या धन घरामध्ये सूर्य देवाचे संक्रमण होणार आहे. यामुळे या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या कालावधीत त्यांना प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. व्यवसायात वाढ होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)