मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचरासोबत त्यांच्या युती, आघाडी, मित्रभाव, शत्रूभाव या सर्वांचा बारीकसारीक विचार केला जातो. गोचर कुंडली ही ढोबळमानाने गणली जाते. सर्वसमावेश राशीचक्रावर कसा परिणाम होईल याचं भाकीत वर्तवलं जातं. त्यामुळे वैयक्तिक कुंडलीतील ग्रहमान अनुकूल असेल तर त्याचा परिणाम वेगळा होतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. ज्योतिषशास्त्रात शुभग्रह आणि पापग्रह अशी वर्गवारी करण्यात आली आहे. काही ग्रहांचं एकमेकांशी पटतं. तर काही ग्रहांचं अजिबात पटत नाही. अशीच एक सूर्य आणि शनि पितापुत्रांची जोडी आहे. या दोन्ही ग्रहांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही. त्यामुळे सूर्य गोचर करत शनिच्या राशीत किंवा शनिसोबत आला की त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. जानेवारीत सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. अर्थात मकर सक्रांतीला सूर्यदेव शनिच्या राशीत असतील. त्यानंतर महिनाभरानंतर कुंभ राशीत गोचर करेल. ही सुद्धा शनिची रास आहे आणि या राशीत खुद्द शनिदेव विराजमान आहेत. त्यामुळे काही काही राशींना फटका बसू शकतो. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना फटका बसणार ते…
कर्क : या राशीला सध्या अडीचकी सुरु आहे. म्हणजेच अष्टम भावात शनि आणि सूर्याची युती होत आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना एखादा दुर्धर आजार ग्रासू शकतो. तसेच वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागेल. कोणतंही काम हाती घेतलं की अडचणींचा डोंगर उभार राहील. त्यामुळे ताक देखील फुंकून पिण्याची गरज आहे. आरोग्य विषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
कन्या : या राशीच्या षष्टम भावात शनि आणि सूर्याची युती होणार आहे. त्यामुळे नकळत नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागेल. अचानकपणे बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध घडू लागतील. आरोग्याच्या तक्रारींने पुरते हैराण होऊन जाल. न्यायालयीन प्रकरणात अपयश पदरी पडू शकतं. या कालावधीत वाहन हळू चालवा. गुंतवणूक करताना मोठी आर्थिक जोखिम घेऊ नका.
मीन : या राशीच्या द्वादश स्थानात सूर्य आणि शनिची युती होत आहे. या राशीच्या शनि साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. या काळावधीत गरजेपेक्षा अधिक पैशांचा खर्च होईल. त्यामुळे कर्जाच्या डोंगराखाली दबून जाल. त्यामुळे गरजांना आवर घाला. गरज असेल तरच पैसा खर्च करा. विनाकारण उसनवारी करू नका. नवीन व्यवसाय सुरु करताना काळजी घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)