नववर्ष 2024 संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. नववर्षात बरीचशी स्वप्न उराशी बाळगून संकल्प केले जात आहे. ज्योतिषशास्त्र मानणाऱ्यांचं लक्ष ग्रहांच्या स्थितीकडेही लागून आहे. भौतिक सुखांचा कारक असलेला शुक्र ग्रह कोणत्या राशीत आहे, इथपासून कोणता योग तयार करत आहे याबाबत उत्सुकता आहे. दैत्यगुरू शुक्र ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो. सुख समृद्धी, धन-वैभव, ऐश्वर्य, सुंदरता आणि प्रेमाचा कारक ग्रह आहे. शुक्र हा ग्रह तूळ आणि वृषभ राशीचा स्वामी आहे. शुक्र मीन राशीत उच्च, तर कन्या राशीत नीचेचा असतो. त्यामुळे शुक्राच्या गोचरामुळे राशीचक्रावर प्रभाव पडत असतो. शुक्र ग्रह नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात मालव्य राजयोग तयार करत आहे. शुक्र ग्रह उच्च स्थानात असताना मालव्य राजयोग तयार होतो. नव्या वर्षात 28 जानेवारीला सकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर याच राशीत 31 मे पर्यंत राहणार आहे. त्यामुळे 31 मेपर्यंत मालव्य राजयोग असणार आहे.
कर्क : या राशीच्या जातकांना मालव्य राजयोग फलदाजी ठरणार आहे. दशम स्थानात हा राजयोग तयार होणार आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. कॅमेरा असलेल्या क्षेत्रात कामात लाभ मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच कमाईचे नवे स्त्रोत निर्माण होतील. भागीदारीच्या धंद्यात अपेक्षित यश मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहील.
धनु : या राशीच्या षष्टम स्थानात मालव्य राजयोग तयार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं यामुळे पूर्ण होतील. नोकरी करत असलेल्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. समाजात मानसन्मान मिळेल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील. कुटुंबातील वाद संपुष्टात येतील. कामासाठी चांगली एनर्जी राहील.
मीन : या राशीतच शुक्र गोचर करणार आहे. शुक्राची ही उच्च रास आहे. त्यामुळे स्वभावात बदल होईल. अविवाहित असलेल्यांना प्रस्ताव येऊ शकतात. तसेच प्रेमप्रकरणात यश मिळू शकते. उद्योगधंद्यात अपेक्षित यश मिळेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं हळूहळू पूर्ण होताना दिसतील. त्यामुळे डोक्यावरचा ताण कमी होईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)