Grah Gochar 2023 : नोव्हेंबर महिन्यात शनिसहित 4 ग्रहांच्या स्थितीत होणार बदल, या राशीच्या जातकांना मिळणार बळ

| Updated on: Oct 26, 2023 | 7:16 PM

Grah Gochar 2023 : नोव्हेंबर महिन्यात चार ग्रहांची उलथापालथ होणार आहे. राहु आणि केतुच्या गोचरामुळे बरीच स्थिती बदलेली असेल. त्यात चार ग्रहांच्या गोचरामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे. चला जाणून घेऊयात..

Grah Gochar 2023 : नोव्हेंबर महिन्यात शनिसहित 4 ग्रहांच्या स्थितीत होणार बदल, या राशीच्या जातकांना मिळणार बळ
नोव्हेंबर 2023 मध्ये ग्रहांची अनोखी स्थिती, काही राशींना मिळणार लाभ
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवर बारीक नजर असते. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करताच राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. नोव्हेंबर महिना संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यात शनि, शुक्र, बुध आणि सूर्याच्या स्थितीत बदल होणार आहे. यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे.नोव्हेंबर महिन्यात बुध ग्रह दोन वेळा राशीबदल करणार आहे. तर सूर्य महिनाभर तूळ राशीत ठाण मांडल्यानंतर वृश्चिक राशीत प्रवेश करेल. शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करेल. तर शनि ग्रह कुंभ राशीत मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्रहांच्या स्थितीनुसार राशीचक्रावर परिणाम होईल. चला जाणून घेऊयात राशीचक्रावर कसा परिणाम होणार ते…

ग्रहांची स्थिती आणि राशींवरील परिणाम

  • शुक्र ग्रह 3 नोव्हेंबरला सकाळी 4 वाजून 58 मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या गोचरामुळे कर्क, कन्या, वृश्चिक राशीच्या जातकांना लाभ मिळेल.
  • शनिदेव सध्या कुंभ राशीत विराजमान आहेत. 4 नोव्हेंबरला 8 वाजून 26 मिनिटांनी कुंभ राशीत मार्गस्थ होईल. यामुळे मेष, वृषभ, तूळ, धनु आणि मकर राशीच्या जातकांना लाभ मिळेल.
  • बुध ग्रह 6 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 4 वाजून 11 मिनिटांनी वृश्चिक राशीत प्रवेश करेल. मंगळ आणि बुध ग्रहामध्ये शत्रूभाव आहे. बुधाच्या गोचरामुळे वृषभ, कर्क, सिंह, धनु राशीच्या जातकांना लाभ मिळेल. बुध ग्रह 27 नोव्हेंबरला सकाळी 5 वाजून 41 मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करेल.
  • सूर्य ग्रह प्रत्येक महिन्याला राशी बदल करत असतो. सूर्य 17 नोव्हेंबरला तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या गोचरामुळे वृश्चिक आणि तूळ राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.

ग्रहांच्या या बदलामुळे राशीचक्रातील 12 राशींवर थोड्या अधिक प्रमाणात परिणाम होईल. काही राशींना फायदा, तर काही राशींच्या अडचणीत वाढ होईल. मेष, वृषभ, कुंभ, तूळ आणि कर्क राशीच्या जातकांना लाभ मिळेल. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना यश मिळू शकते. पदोन्नती किंवा पगारवाढ होऊ शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या जातकांना लाभ मिळेल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होऊ शकतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)