ज्योतिष शास्त्रानुसार अंक 6 चा मूलांक शुक्र ग्रहाशी संबंधित आहे, जो सौंदर्य, प्रेम, विलास आणि सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. तर तुमचे सुद्धा मूलांक ६ असेल तर 2025 हे वर्ष तुमच्यासाठी अनेक नवीन शक्यता आणि संधी घेऊन येणार आहे. जाणून घेऊया नवीन वर्षात अभ्यास, करिअर, प्रेम, लग्न आणि मालमत्तेच्या बाबतीत तुमचा वेळ कसा राहील.
अभ्यास आणि करिअर
मूल्यांक ६ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी २०२५ हे वर्ष प्रगतीचे ठरणार आहे. क्रिएटिव्ह क्षेत्र, कला, डिझाइन, फॅशन किंवा मीडिया क्षेत्रात असणाऱ्यांसाठी हे वर्ष विशेष फायदेशीर ठरेल. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या वर्षी यश मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर करिअर क्षेत्रात असलेल्या व नोकरदारांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. तसेच उच्च पद किंवा पदोन्नतीची अपेक्षा करू शकता.तसेच व्यावसायिक लोकं नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करू शकतात, जे दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरतील.
प्रेम आणि विवाह
मूलांक ६ असलेल्या व्यक्तीच्या वैवहिक जीवन आणि प्रेम प्रकरणासाठी २०२५ हे वर्ष चांगले असणार आहे. प्रेमाच्या बाबतीत हे वर्ष रोमान्स आणि आनंदाने भरलेले असेल. तसेच जे अविवाहित आहेत ते या वर्षी जीवनसाथी शोधण्याचे संकेत मिळू शकतात. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर नातं अधिक घट्ट होईल. त्याचबरोबर विवाहित व्यक्तींसाठीही हा काळ अनुकूल राहणार आहे आणि नात्यात नवीन ऊर्जेचा अनुभव येईल. मात्र मूलांक ६ असलेल्या व्यक्तींनी कौटुंबिक बाबींमध्ये समतोल राखणे आवश्यक आहे.
प्रॉपर्टी आणि गुंतवणूक
ज्योतिषशास्त्रानुसार अंक 6 असलेल्यांसाठी 2025 हे वर्ष संपत्तीच्या दृष्टीने शुभ राहणार आहे या वर्षी तुम्ही जर एखादे नवीन घर किंवा जमीन खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ती गोष्ट यशस्वी होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या जुन्या मालमत्तेच्या वादात अडकल्यास तो निकाली निघण्याची शक्यता आहे. मूलांक ६ असलेल्या व्यक्तीने एखाद्या गुतवणुकीमध्ये पैसे गुंतवणुक केली असेल तर हे वर्ष फायदेशीर ठरेल, परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अंक 6 साठी 2025 हे वर्ष प्रगती, यश आणि आनंदाचे असेल. करिअर असो, प्रेम असो वा प्रॉपर्टी, प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. कठोर आणि शहाणपणाने काम करा आणि यश तुमच्या सोबत असणार आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)