अंकशास्रानुसार (Numerology 20 june 2022), एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = 2 असेल. तर एकूण जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष याला भाग्यांक (20 june lucky number) म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे. अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की, नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनिक अंकशास्त्र अंदाज वाचून, तुम्ही दोनीही परिस्थितीसाठी तयार राहाल.
- अंक-1
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असेल. नशिबाने साथ दिल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी संपतील आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील.
शुभ अंक – 18
शुभ रंग- लाल
- अंक- 2
आजचा दिवस साधारण असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करावे लागेल, तरच त्यांना यश मिळू शकेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल.
शुभ अंक -1
शुभ रंग – जांभळा
- अंक- 3
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेत होतील. हितशत्रूंच्या कारवायांपासून सावध राहा. प्रलोभनांना बळी पडू नका.
शुभ अंक- 6
शुभ रंग – गुलाबी
- अंक- 4
आजचा दिवस तुमची प्रतिष्ठा वाढवणारा असेल. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना बढतीचे योग आहेत. मुलांनी केलेल्या काही चांगल्या कामांची समाजात प्रशंसा होईल.
शुभ अंक- 5
शुभ रंग – नारंगी
- अंक- 5
सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोकं त्यांच्या काही वैयक्तिक समस्यांबाबत वादात राहतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एखाद्या वरिष्ठ व्यक्तीकडून टोमणे ऐकावे लागू शकतील. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असेल.
शुभ रंग- 10
शुभ रंग- पिवळा
- अंक- 6
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यवसायाशी निगडीत काही समस्या असतील तर त्या तुमच्या कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांसोबत मिळून सोडवणे तुमच्यासाठी चांगले राहील. जुन्या मित्रांची भेट होईल.
शुभ अंक -2
शुभ रंग – खाकी
- अंक- 7
तुमच्यावर खोटा आळ घेतला जाऊ शकतो. कुटुंबातील सदस्य तुमच्या यशाचा पुरेपूर आनंद घेतील. नोकरीत असलेल्या लोकांना नवीन पदावर नियुक्त केले जाऊ शकते.
शुभ अंक -3
शुभ रंग – हलका पिवळा
- अंक- 8
पोटाशी संबंधित काही समस्या उदभवू शकतात. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होणार नाही याकडे लक्ष द्यावे. व्यवसायासंबंधी नवीन योजना आखाल.
शुभ अंक- 22
शुभ रंग- गुलाबी
- अंक- 9
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल परिणाम देईल. प्रतिकूल हवामान आज तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत आनंदात वेळ घालवाल.
शुभ अंक- 6
शुभ रंग- निळा
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)