Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 7 ऑगस्ट रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग
Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.
1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.
2 / 10
कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. या बदल्यात तुम्हाला चांगला मोबदला मिळू शकतो. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुणावेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.
3 / 10
कौटुंबिक वातावरणात कलह दिसून येईल. छोट्या छोट्या कारणावरून वाद होतील. कामात काही नवीन संधी चालून येतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.
4 / 10
तुम्हाला काही ओळखीच्या लोकांकडून मदत होऊ शकते. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून अडकलेलं काम मार्गी लागेल. दुसऱ्याकडून चांगलं काही घेण्याचं प्रयत्न करा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा असेल.
5 / 10
कामाच्या ठिकाणी हितशत्रूंकडून काही त्रास देण्याचा प्रयत्न होईल. पण त्याची चिंता करू नका. कारण तुम्ही तुमच्या कामाच्या जोरावर त्यांची तोंड बंद कराल. विनाकारण वाद घालू नका. शुभ अंक 18 आणि शुभ रंग करडा असेल.
6 / 10
कोणत्याही कामाचा जास्त ताण घेतला की होणारं कामही बिघडतं. त्यामुळे निश्चिंत राहून काम करायला सुरुवात करा. कुटुंबाला वेळ देण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.
7 / 10
तुम्हाला काही नातेवाईक आणि मित्र भेटण्याची शक्यता आहे. अचानक भेट झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. काही जुन्या आठवणींना उजाला मिळेल. पण खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केशरी असेल.
8 / 10
दूरच्या प्रवासाचा योग जुळून येईल. त्यामुळे वातावरण बदल झाल्याने मन प्रसन्न होईल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत करा. मुलांना त्यांच्या आवडीनुसार छंद जोपासायला मदत करा. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.
9 / 10
मित्रांकडून दगाफटका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांचा व्यवहार करताना दहावेळा विचार करा. तसेच पार्टनरशिपच्या धंद्याकडे लक्ष द्या अन्यथा नुकसान होऊ शकते. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल असेल.
10 / 10
कामाच्या बाबतीत आजचा दिवस तुमचा आहे. या महिन्यातील सर्वात बेस्ट दिवस राहील. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)