ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राचंही तितकं महत्त्वं आहे. कोणत्या तारखेला जन्माला आलात आणि ते वर्ष कोणतं होतं? यावरून मुलांक काढला जातो. जर एखाद्याचा जन्म 1, 10, 28 तारखेला झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मूलांक हा 1 असतो. 1 या अंकावर सूर्याचा प्रभाव आहे. तसाच प्रत्येक अंकावर ग्रहमंडळातील नऊ ग्रहांचा प्रभाव आहे. आता नवीन वर्षाची चाहुल लागली असून त्याच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु आहे. अनेकांनी या नव वर्षात अनेक संकल्प केले आहेत. त्या संकल्पाची पूर्तता करण्यासाठी आतापासून पूर्वतयारी सुरु केली आहे. पण नववर्षात आपल्याला ग्रहांची आणि अंकशास्त्रांची साथ लाभणार का? याकडेही लक्ष दिलं जात आहे. नववर्षावर कोणत्या ग्रहाचा प्रभाव असणार आहे याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. नव वर्षावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असणार आहे. तसेच 9 मूलांक असणाऱ्या जातकांना त्याचा लाभ मिळणार आहे. 9, 18, 27 या तारखांना जन्म झालेल्या व्यक्तीचा मूलांक हा 9 असणार आहे. 9, 1+8= 9, 2+7 =9 असा हा मूलांक काढला जातो. त्यामुळे या तारखांना जन्मलेल्या जातकांना पुढचं वर्ष चांगलं जाणार आहे.
2024 या वर्षावर शनि ग्रहाचा अंमल होता. कारण 2024 या वर्षाची बेरीज ही 8 येते आणि 8 हा अंक शनीशी निगडीत आहे. तसंच नववर्ष 2025 या वर्षाची बेरीज ही 9 येते आणि या अंकावर मंगळाचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे या क्रमांकाचा जातकांना मंगळाची उत्तम साथ लाभणार आहे. कोणत्या मूलांकावर मंगळाचा कसा प्रबाव असेल ते जाणून घेऊयात
1 हा अंक सूर्याचा आहे. सूर्य आणि मंगळ यांच्यात मैत्रिपूर्ण संबध आहेत. आर्थिक वाढ आणि नव्या योजनांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. 2 हा अंक सूर्याशी निगडीत आहे. चंद्र आणि मंगळ या युतीने धनलक्ष्मी योग तयार होतो. त्यामुळे आर्थिक स्थिती या काळात झपाट्याने बदलेल. 3 हा गुरुचा अंक आहे. पुढच्या वर्षात कामाकडे विशेष लक्ष द्यावं गाले आणि शब्द जपून वापरावे लागतील. 4 या क्रमांकावर राहुचा प्रभाव आहे. मंगळ आणि राहुच्या युतीमुळे अंगारक योग तयार होतो. त्यामुळे नववर्षात 4 मूलांक असलेल्यांनी सावध पावलं उचलावीत.
5 हा अंक बुधाचा आहे. मंगळ आणि बुधाच्या स्वभावात विसंगती आहे. त्यामुळे या काळात व्यवसायिक नुकसाने, अभ्यासात लक्ष न लागणे वगैरे असे प्रश्न उद्भवतील. शेअर मार्केटशी निगडीत लोकांनी काळजी घ्यावी. 6 हा अंक शुक्राचा आहे. शुक्र मंगळ यांच्यात तटस्थ नातं आहे. त्यामुळे हा काळ चांगला अनुभव देणारा राहील.
7 हा अंक केतुशी निगडीत आहे. मंगळ केतुच्या युतीमुळे काही आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढू शकतात. मालमत्तेत मोठी गुंतवणूक टाळा. 8 हा अंक शनिचा आहे. हा काळ कठीण असणार आहे. कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. सकारात्मक विचार ठेवणं खूपच गरजेचं आहे. 9 हा अंक मंगळाचा आणि नव वर्ष मंगळाचं आहे. त्यामुळे मूलांक 9 असलेल्या जातकांना या वर्षाचा पुरेपूर लाभ घ्यावा. अडकलेली कामं मार्गी लागतील.