हस्तरेषाशास्त्र
Image Credit source: Social Media
मुंबई, हिंदू ज्योतिषशास्त्रात हस्तरेषाशास्त्र (Palmistry) ज्ञानाला खूप महत्त्व दिले आहे. हस्तरेषा शास्त्राच्या मते मानव जीवनाशी संबधित अनेक माहिती मिळू शकते. व्यक्तीच्या हाताच्या रेषा तसेच हातावरील निशाण पाहून भविष्यातील अनेक संकेत दिले जातात. ज्या लोकांच्या हातामध्ये सूर्य, पर्वत, शुक्र पर्वत आणि गुरू पर्वत असतो त्यांच्या जीवनात अपार धनसंपत्ती मिळते. तसेच अनेक शक्ती धनवान बनण्यासाठी प्रयत्न करतात. कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाच्या तळहातावर बनलेले काही विशेष चिन्ह त्यांना भाग्यवान बनवतात. हस्तरेषाशास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या हातावर काही शुभ चिन्ह असतील तर तिच्या जीवनात सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. अशी स्त्री राणीसारखं आयुष्य जगते. तिला भरपूर संपत्ती, आदर आणि पतीचे प्रेम मिळते.
हस्तरेखाच्या या शुभ चिन्हांमुळे स्त्रीचे भाग्य खुलते
- रथ: ज्या स्त्रीच्या तळहातावर रथाचे चिन्ह असते, तिच्या आयुष्यात धन आणि कीर्तीची कधीही कमतरता नसते. अशी स्त्री आपल्या गोड बोलण्याने सर्वांची मने जिंकते आणि पूर्ण स्वाभिमानाने आयुष्य जगते.
- शंख: ज्या स्त्रीच्या हातात शंख असतो, तिच्यावर लक्ष्मी देवीची कृपा असते. अशा महिला अपार संपत्तीच्या मालक होतात. ते खूप खर्च देखील करतात. ती स्वत: अभिमानाचे जीवन जगते, तसेच इतरांना मदत करण्यासाठी पैसे खर्च करते.
- स्वस्तिक: स्त्रीच्या तळहातावर स्वस्तिक चिन्ह असणे खूप शुभ असते. अशा महिलांना आयुष्यात खूप यश मिळते. ते कोणत्याही क्षेत्रात गेले तरी उच्च स्थान प्राप्त करतात. त्यांना पैशाची कधीच कमतरता नसते.
- त्रिशूल: तळहातातील त्रिशूलचे चिन्ह व्यक्तीला खूप भाग्यवान बनवते. विशेषत: सूर्य, शनि आणि गुरु पर्वतावर त्रिशूल चिन्ह असल्यास खूप लाभ होतो. हे लोक त्यांच्या करिअरमध्ये उंची गाठतात. यासोबतच ते संपत्तीचे मालक बनतात आणि त्यांना प्रचंड मान-सन्मान मिळतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)