मुंबई, हस्तरेषा हा ज्योतिषशास्त्राचा (Palmistry) असा विषय आहे, ज्याद्वारे जीवनात घडणाऱ्या घटना आणि सुख दुःखाचा अंदाज लावला जाऊ शकतो. तळहातावरील रेषा व्यक्तिमत्वाशी (Personality) निगडीत अनेक रहस्ये उघड करतात. हस्तरेषेचे महत्त्व हस्तरेषाशास्त्रात स्पष्ट केले आहे. या रेषांद्वारे व्यक्तीचे आयुष्य, त्याचा स्वभाव आणि भविष्यात येणारे अनुभव याचा कयास बांधला जातो. जोतिषतज्ज्ञांच्या मते तळहातावर अशा रेषा आणि खुणा (Sign) असतात, ज्या व्यक्तीचे सुखी जीवन दर्शवतात. चला तर मग जाणून घेऊया सुखी जीवनाशी संबंधित या रेषा आणि चिन्हांबद्दल.
हस्तरेषा शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर मस्तकाची रेषा खोल आणि स्पष्ट असेल तर ती शुभ मानली जाते. मस्तकी रेषा बृहस्पति पर्वताकडे वाकून चतुर्भुज बनत असेल तर ते राजयोगाचे लक्षण आहे.
तसेच गुरू आणि मंगळ उच्चस्थानी असल्यास जीवन आनंदी राहते. अनामिकाजवळ तळहाताच्या तळाशी सगुण रेषा आणि मणिबंधातून मधल्या बोटापर्यंत जाणारी शनि रेषा असेल तर ती देखील शुभ असते. असे लोकं आयुष्यात खूप प्रगती करतात आणि भविष्यात यश मिळवतात. या लोकांच्या जीवनात सुख-सुविधांची कमतरता नसते.
हस्तरेषा शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर घोडा, त्रिशूल, झाड, घागरी, खांब असे चिन्ह बनवलेले असेल तर ते त्याच्या सुखी जीवनाचे लक्षण मानले जाते. अशा व्यक्तीचे जीवन सुख-समृद्धीने भरलेले असते.
दुसरीकडे तळहातावर धनुष्य, चक्र, माला, ध्वज, रथ असे चिन्ह असेल तर त्यावर माता लक्ष्मीची कृपा राहते. अशा लोकांच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते. ज्यांचे नखे चमकदार असतात, ते नेहमी आनंदी जीवन जगतात.